
पोलिसांची बदनामी करणाऱ्या रानबाजार वेबसिरीज वर कार्यवाही झालीच पाहिजे...!
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची मागणी_
नवी मुंबई : मराठी वेब सिरीज दाखविणाऱ्या मराठी प्लॅनेट या वेब सिरीज प्लॅटफॉर्मवर अभिजीत पानसे दिग्दर्शित 'रानबाजार' वेबसिरीज मध्ये पैसे कमावण्याच्या हव्यासा पोटी पोलिसांची खूप खालच्या पातळीवर बदनामी केली गेली आहे. यासाठी या सिरीजवर बंदी आणावी तसेच संबंधित वेब सिरीज च्या कलाकारांच्या टीमवर कठोर कार्यवाही व्हावी यासाठी त्यांचा विरोधात महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष
मा. राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभरात तक्रार नोंदवली जात आहे. ही वेब सिरीज बंद व्हावी यासाठी नवी मुंबईतील कार्यकारणीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी नवी मुंबई शहराध्यक्ष मयूर कारंडे व सहअध्यक्ष निलेश ढाकणे यांच्या नेतृत्वात नेरूळ पो.स्टेशन, सानपाडा पो.स्टेशन, ए.पी.एम.सी पो.स्टेशन, वाशी पो.स्टेशन, कोपरखैरणे पो.स्टेशन, रबाले पो.स्टेशन येथे 'रानबाजार' सीरिज वर गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देण्यात आले. तसेच नवी मुंबई सचिव प्रदीप कणसे, युवा संपर्कप्रमुख अनंतराज गायकवाड, ऐरोली विभाग प्रमुख प्रमोद सावंत, घणसोली विभाग प्रमुख विराज यादव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम