दलित पॅंथर संघटनेकडून ५० वा सुवर्ण महोत्सव दिन साजरा!..
नवी मुंबई : सन १९७२ मध्ये दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा उभारण्यासाठी तरुण युवकांनी स्थापित केलेल्या दलित पॅंथर या संघटनेला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे त्या अनुषंगाने दलित पॅंथर चा सुवर्णमहोत्सव मुंबईतील मराठी पत्रकार संघ या ठिकाणी दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला यावेळी महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून दलित पॅंथर कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती दाखवात दलित पँथरच्या चळवळीला आणि त्याच्या कार्याला उजाळा दिला
दरम्यान सुवर्ण महोत्सवाच्या कार्यक्रमा दरम्यान पँथरच्या कार्यकर्त्यांनी पँथर वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी कार्यकर्त्यांनी देखील तळागाळा पर्यंत पोहोचले पाहिजेत अन्याय तिथे पॅंथर हा संदेश घेऊन पॅंथर संघटनेकडून रस्त्या वरची लढाई देखील लढली जाईल असे सुवर्ण महोत्सव दिनात स्पष्ट करण्यात आले
या वेळी राजेश सोनवणे, कार्याध्यक्ष जगदीश इंगळे, महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर घनश्याम भोसले ,कोषाध्यक्ष भाई बन्सवाल, वाशीम येथील विनोद दलित पँथरच्या महिला महाराष्ट्र अध्यक्ष कविता ताई भोंडे पुणे शहर महिला अध्यक्ष अनिता गायकवाड, भारत चव्हाण, दलित पॅंथर चे मुंबई जिल्हाध्यक्ष रोहित भंडारे, महाराष्ट्र महिला सचिव रमाताई अहिरे, मीरा-भाईंदर अध्यक्ष, अर्जुन तायडे, दलित पँथर संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख सुनील गायकवाड पालघर जिल्हा अध्यक्ष विजेंद्र (साई) जगदीश ठाकूर, इत्यादी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम