लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची घणसोली च्या बुद्धघोष बुद्ध विहारात जयंती साजरी!

नवी मुंबई (प्रतिनिधी)कोल्हापूरचे आदर्श राजे आरक्षणाचे जनक समतेचा पुरस्कर्ता छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १४८ वी जयंती घणसोली तील बुद्धघोष  बुद्ध विहार येथे बुद्धविहार बचाव कृती समितीतर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंती निमित्ताने घनसोली विभागातील बहुजन बांधवांनी मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती दाखवून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन केले अनेक मान्यवरांनी राजश्री शाहू महाराजांच्या बाबतीत आपले विचार प्रकट करून छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नात्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला 


दरम्यान: छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून घनसोली मध्ये बौद्ध बांधवांचे स्वतःच्या मालकीचे बुद्ध विहार असायला हवे यासाठी बौद्ध बांधवांनी बुद्ध विहाराला सिडको प्रशासनाकडून जमीन मिळाली पाहिजे अशी आग्रही भूमिका घेत मोठ्या प्रमाणात एकजूट निर्माण करत सिडकोकडे आपली भूमिका मांडण्यासाठी बुद्धविहार बचाव कृती समितीतर्फे भविष्यात निर्माण होणाऱ्या जमिनीच्या प्रश्नाबाबत आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे

यावेळी बुद्धघोष बुद्धविहाराचे अध्यक्ष रमेश बनसोडे ,बुद्ध विहार कृती समितीचे अध्यक्ष सुरेश कांबळे, सचिव सचिन कटारे, उपाध्यक्ष जयराम जाधव, अनिल पाथरे, प्रकाश माळवे, अक्षय कदम, साहित्यिक तथा आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संस्थेचे सेक्रेटरी हरिचंद्र जाधव, माजी पोलीस अधिकारी राहुल बोराटे उत्तम रोकडे धोडीराम सूर्यवंशी बामसेफचे संजय माळी ज्ञानबा सूर्यवंशी वंचित बहुजन आघाडीचे नेते गजानन जाधव आर डी रोकडे,   संभाजी रोकडे गुरव समाजाचे नेते जयवंत महाराज गुरव शेतकरी कामगार पक्षाचे संतलाल शर्मा हनुमंत बनसोडे, प्रकाश जाधव, अविनाश कोरडे, बुद्ध विहार बचाव कृती समितीचे खजिनदार हर्षवर्धन आहिरे राजेंद्र झेंडे, अशोक खंकाळे, अशोक घायवट, प्रभाकर ओव्हाळ, इत्यादी मान्यवर उपस्थित होते

संबंधित पोस्ट