चला संकल्प करूया ! एक एक झाड लावूया! परिवर्तन महिला बाल विकास संस्थेतर्फे ठाणे परिसरात ३० झाडाची लागवड !
नवी मुंबई : देशामध्ये वाढते प्रदूषण ही चिंताजनक बाब बनली असून ही चिंता थांबवायचे असल्यास चला संकल्प करूया एक एक झाड झाडे लावूया असं म्हणत ठाणे शहरामध्ये कार्यरत असलेल्या परिवर्तन महिला व बाल विकास संस्थेतर्फे ठाण्याच्या रायलादेवी परिसरात ३० झाडांच्या रोपांची लागवड संस्थेमार्फत करण्यात आली
ज्याचा मध्ये लिंबाचे १० झाड, वड ५, उंबर ५, पीपल १० या झाडांच्या वृक्षाची लागवड करण्यात आली
दरम्यान: पहिल्या टप्प्यामध्ये ३० झाडे लावण्यात आली असून संस्था तर्फे १५० झाडे लावण्याचा संकल्प असल्याचे संस्थेचे अध्यक्षा सोनिया गिल यांनी सांगितलेले आहे
या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात संस्थेचे श्रीमती. सोनिया गिल संस्थापक/अध्यक्षा , परिवर्तन महिला व बाल विकास संस्था श्री.अमृत कुमार, ठाणे शहर अध्यक्ष परिवर्तन महिला व बाल विकास संस्था, सौ.अलका कुबल, सौ.संगीता मॅडम, सौ.कादंबरी प्रजापती, श्री.विजय गोसावी इत्यादी संस्थेचे पदाधिकारीउपस्थित होते.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम