स्वरांजली देशमुख एस.एस.सी परीक्षे मध्ये ९७.४०% ने उत्तीर्ण!

नवीमुंबई  (प्रतिनिधी) २०२१ व २०२२ माध्यमिक शाळेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला या निकालाकडे पालकवर्गा सह विद्यार्थ्यांचे देखील लक्ष लागले होते त्यात काही विद्यार्थ्यांना अपेक्षित गुण प्राप्त झाले तर काहीना ब-या पक्की! अशातच ज्या विद्यार्थ्यां /विद्यार्थ्यांनीना पैकीच्या पैकी  किंवा तिथपर्यंत पोहचवणारे  गुण प्राप्त झाल्यावर त्यांच्या आनंदाची सीमा वेगळीच असते.

तात्या साहेब  कोरे इंग्लिश अकँडमी वारणानगर इयत्ता दहावी मध्ये शिकत असणारी विद्यार्थिनी स्वरांजली रणजित देशमुख या विद्यार्थिनी ९७.४०% गुण प्राप्त करून शाळेमध्ये दुसरा क्रमांकाची विद्यार्थी म्हणून आपला ठसा उमटवला आहे या विद्यार्थिनी गणित या विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण प्राप्त करून आपली गणित विषयाची आवड सिद्ध केलेली आहे.

दरम्यान: तात्या साहेब कोरे इंग्लिश अकॅडमी वारणा नगर या विद्यालयातून अभिमान संजय पाटील याने ९८.४०% इतके गुण प्राप्त करून या विद्यालयात प्रथम येण्याचा मानकरी ठरलेला आहे स्वरांजली देशमुख आणि अभिमान पाटील यांचे त्यांच्या  विद्यालयाच्या शिक्षकाकडून कडून शैक्षणिक स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे

संबंधित पोस्ट