स्वच्छतेच्या पुरस्कारासाठी धडपडणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेचा निर्लज्जपणाचा कळस? डॉ. बाबासाहेब आंबेडकर नामफलकाची दुरावस्था !..
नवी मुंबई :( प्रतिनिधी) देशामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रथम क्रमांक आला पाहिजे यासाठी धडपड करणारी आणि स्वच्छतेवर करोडो रुपयांचा चुराडा करणारी नवी मुंबई महानगरपालिका ही देशातील अधिक महानगरपालिकांच्या स्वच्छतेचा पुरस्कारासाठी मानकरी ठरणाऱ्या आणि क्रमांक एकचा स्पर्धेत असणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेला परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नाम फलकाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याचे चित्र कोपरखैरणे प्रभात समिती अंतर्गत दिसत आहे. रस्त्यावरच्या भिंतीला रंगरंगोटी करून त्या भिंतीला चमक देणारी महानगर पालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नामफलका बाबत का उदासीन आहे असा संतप्त सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाने व्यक्त केला आहे
कोपरखैराने रेल्वे स्थानक भुयारी मार्ग ते तीन टाकी ज्ञानविकास चौक पर्यंतचा रस्ता हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग या नावाने ओळखला जातो. मागील काही वर्षापासून शहराचे सौंदर्यकरण करण्याची प्रक्रिया महापालिकेच्यावतीने केली जात आहे या प्रक्रियांमध्ये करोडो रुपयांचा चुराडा झालेला आहे मात्र या मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग या नामफलकाची दुरावस्था झालेली असून ही दुरवस्था आंधळ्याचे रूप धारण केलेल्या सहाय्यक आयुक्त प्रशांत गावडे यांना दिसत नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान : सेक्टर तीन व चार ला जोडणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सुद्धा सुशोभित करण्यापासून उपेक्षित आहे. तसेच सेक्टर- .१९ धम्म शील बुद्ध विहाराच्या समोर असलेल्या स्मशानभूमीतील झाडांच्या फांद्या वाढल्या असून पावसाळ्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही यातून एखादी दुर्घटना घडू शकते. या सर्व गंभीर बाबी असून यावर पालिका जाणीवपूर्वक जातीवादी हेतूने कामात उदासीनता दाखवत असल्याचा आरोप देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने केला आहे. त्याबाबतचे पत्र युवा ठाणे जिल्हाअध्यक्ष यशपाल ओहोळ कोपरखैराणे विभागप्रमुख रामराव बोदडे यांनी विभागकार्यालयास दिले असून त्वरित सुशोभीकरणाची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी केली आहे. अन्यथा पक्षाच्यावतीने पालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा सूचक इशारा देण्यात आला आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम