परिवर्तन महिला व बाल विकास संस्थेतर्फे गरजूंना धान्य वाटप ! संस्थेच्या पद वाटपाचा कार्यक्रम संपन्न!

नवीमुंबई : देशभरात कार्यरत असलेल्या परिवर्तन महिला व बालविकास संस्थेतर्फे ठाण्यात गरीब व गरजू महिलांना मोफत धान्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमादरम्यान अनेक गरीब गरजू नागरिकांनी आपली उपस्थिती दाखवून संस्थेमार्फत मार्फत दिल्या जाणाऱ्या मोफत धान्याचा लाभ मिळण्यासाठी नागरिकांनी संस्थेच्या कार्यालयांमध्ये मध्ये हजेरी लावली

परिवर्तन महिला व बाल विकास संस्था तर्फे १२ निराधार महिलांना दर महिन्याला  धान्य वाटप करण्यात येत असते

संस्थेचे अध्यक्षा सोनिया गिल , ह्यांचा हस्ते देशातील काही राज्यांमधील  सदस्यांना पद वाटप करण्यात आले, आशिष त्रिवेदी ह्यांना  राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी ह्या पदा वर नियुक्त करण्यात आले असुन कुवरजी अमृत कुमार ह्यांना  ठाणे शहर अध्यक्ष पदी नियुक्त केले आहे माथुर अमित   मिरा भाईंदर शहर अध्यक्ष  राधेश्याम त्रिवेदी  गुजरात प्रदेश अध्यक्ष  सुरेश सोनी इंदौर शहर अध्यक्ष सौ. इंदू आचार्य  भोईसर शहर अध्यक्ष) सौ. अलका जोशी सदस्य  सौ. उर्मिला राजेश धनावडे सदस्य ह्या प्रमाणे पद देण्यात आले. 


दरम्यान संस्थेचे अध्यक्ष सोनिया गिल यांनी अत्यंत खडतर प्रवास करून संस्थेचे वटवृक्ष फुलविले  आहे यांच्या अथक परिश्रमामुळे संस्थेला एटी जी सर्टिफिकेट प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे. म्हणूनच संस्थेमार्फत गेल्या काही वर्षापासून अनेक गरीब गरजू लोकांना संस्था आपली आधार वाटू लागलेली आहे. ज्यांना यावेळी पदे देण्यात आलेली आहेत त्यांनीदेखील संस्थेचे नियम धोरण उद्दिष्ट या  प्रमाणे वाटचाल करून संस्थेचे नाव लौकिक करावे असे आव्हान नाही संस्थेचे अध्यक्षा सोनिया गिल यांनी केलेला आहे.

संबंधित पोस्ट