
घोड्यांची झुंज लावणारे आणि घोडे नाचवणारे नामानिराळे असतात लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे :उत्कर्षा रुपवते यांनी व्यक्त केले मत!
नवी मुंबई (प्रतिनिधी ) देशामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची सीमा पूर्णत्व बदलत असुन समाजकारण आणि राजकारण कोणत्या दिशेला जात आहे हे समजण्याच्या पलीकडे आहे नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील मोग्रस या गावी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती साजरी करत असताना आयोजकांनी महापुरुषांना वंदन करून मिरवणुकी दरम्यान घोडे नाचून मोग्रस गावात जल्लोष करण्यात आला.
वास्तविक पाहता घोडे कधीही स्वतः नाचत नसतात या घोड्यांना नाचवणारे कोणीतरी असतात हे सत्य असताना कुणाच्यातरी तालावरती नाचणे बंद केले पाहिजे तरच आंबेडकर चळवळ पुढे जाईल आणि कार्यकर्ते सुद्धा आपोआप मोठा होईल असे मत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते यांनी मोग्रस येथील जयंती महोत्सवाच्या जाहीर सभेमध्ये बोलताना व्यक्त केले.
यावेळी कायदे तज्ञ एडवोकेट संघराज रुपवते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे राज्य नेते सुरेश देठे आयोजक सुरेश जगधने, पत्रकार सुनील गायकवाड,भीमराव जगधने, प्रकाश देठे, मोग्रस गावातील महिला पोलीस पाटील सविता गायकर, महिला सरपंच ज्योती गायकर, विकास सहकारी सोसायटी चे चेअरमन योगेश गोडसे, पोपट सोनवणे, प्रकाश डोळस, कोंडाजी जगधने, यांच्या उपस्थितीमध्ये जयंती महोत्सवाचा कार्यक्रम सुरळीत पार पडला
सूत्रसंचालन बाळासाहेब जगधने,व शंकर जगधने यांनी केलेया वेळी जयंती महोत्सवाच्या उपस्थित नागरिकांना अन्नदान रंजना गौतम जगधने यांच्या वतीने देण्यात आले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम