
काँग्रेसतर्फे डॉक्टर अनिल साळुंखे यांची भटक्या जाती विमुक्त जाती महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी निवड
नवीमुंबई (प्रतिनिधी ) गेल्या 35 वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत असलेले पक्षाचे एकनिष्ठ सेवक म्हणून प्रसिद्ध असणारे डॉक्टर अनिल साळुंखे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भटक्या विमुक्त जाती विमुक्त जाती सेलच्या महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात केली आहे
काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विमुक्त भटक्या जाती जमातींना जोडण्याचे काम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी जोरदार पणे सुरू केले आहे.आणि त्या अनुषंगाने राज्यातील तमाम विमुक्त भटक्यांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या आदरणीय सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली तमाम विमुक्त भटके कटिबध्द होत आहेत.याच उद्देशाने डॉ अनिल साळुंके यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विमुक्त जाती भटक्या जमाती सेल वर नियुक्ती करण्यात आली आहे.या वेळी मदन जाधव अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विमुक्त जाती भटक्या जमाती सेल आत्माराम जाधव अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा टायगर्स यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
डॉ अनिल साळुंके यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरावर स्वागत होत आहे. बोगस प्रतिबंध अभियान राबविण्यात यशस्वी झालेल्या आणि विमुक्त भटक्या जाती जमातींचा उन्नती, उत्कर्ष आणि विकास साधण्यासाठी योग्य रित्या वाटचाल करीत आपल्या कामाला अधिक गती आणि व्यापक स्वरूप देण्याचा त्यांचा मानस आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी व्यक्त केला.आणि सर्वांचे मनःपूर्वक आभार प्रदर्शन करून दलीत शोषित,पीडित, तळागळातल्या,तांड्यावर, पालात राहणाऱ्या लोकांसाठी कायम कटिबध्द असल्याचे त्यांनी या निवडी दरम्यान सांगितले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम