अपात्र शिक्षकावर नवी मुंबई महानगरपालिकेने कारवाई न केल्यास आंदोलन छेडणार! संतोष मगर यांचा इशारा!
नवीमुंबई (प्रतिनीधी ) केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे पात्र शिक्षकांना टी ई टी परीक्षा दिल्या शिवाय सरकारी नियम प्रमाणे शासकीय निमशासकीय अथवा खाजगी शिक्षण संस्थेमध्ये सेवा करण्यास मनाई असल्याचे परिपत्रक सन 2009 मध्ये जाहीर झाले आहे मात्र राज्य भरामध्ये मध्ये टी ई टी परीक्षा न देणाऱ्या अथवा परीक्षा उत्तीर्ण न होणाऱ्या शिक्षकांचा भरणा ठेकेदार पद्धती वरती सुरू आहे.
राज्यात सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून गणना होणाऱ्या विविध स्तरावर अनेक पुरस्कार घेणाऱ्या नवी मुंबई महानगर पालिकेतील शिक्षण विभाग अनेक प्रकारे नियमबाह्य वागून नवी मुंबईतील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देताना मात्र जाणीवपूर्वक अपात्र शिक्षकांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांचे वर्षानुवर्षे शैक्षणिक नुकसान करीत असल्याचा आरोप डी.टी.एड बीएड स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संतोष मगर यांनी आयोजित पत्रकार परिषद मध्ये केला आहे नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या शिक्षकांची संख्या 134 आहे ते संविधानिक दृष्ट्या अपात्र असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले
नमूद संदर्भ क्रमांक 1 ते 19 मधील सर्वोच्च न्यायालय केंद सरकार राज्य शासन यांचे विविध निर्णय व आदेश पाहता सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी वरील संस्थाने अनेक नियम बनविले आहेत परंतु नवी मुंबई महानगरपालिका कोणत्याही निर्णयाचे आदेशाचे पालन न करता अनेक वर्षापासून नियमबाह्य अपात्र शिक्षकांच्या ठोक मानधन स्वरूपात नेमणुका करीत नवी मुंबईतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करीत त्यांच्या भवितव्याची खेळत असून केंद्र सरकारच्या कायद्याची फसवणूक करत असल्याचा उघड पुरावा आहे असे मत देखील त्याने पत्रकारांसमोर विविध प्रकारचे केंद्र शासनाचे व राज्य शासनाचे जीआर दाखवत पालिकेच्या शिक्षण विभागाचा भांडाफोड केला आहे.
दरम्यान : याबाबतचे सर्व निर्णय आदेश सहित दिनांक 25 एप्रिल 20 22 रोजी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर शिक्षण उपायुक्त यांना प्रत्यक्ष भेटून चर्चेअंती सर्व शासकीय आदेशा सह निवेदन सादर केलेले असल्याचे देखील त्यांनी सांगितले परंतु नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार न करता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत नियमबाह्य अपात्र शिक्षकांना पुन्हा पुढील सहा महिन्यासाठी सेवेचे आदेश देत सर्व निर्णय व आदेशांचा अवमान करत आहेत आहे ही बाब म्हणजे जाणीवपूर्वक नवी मुंबईतील भावी पिढीचे आजच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानच करण्यासारखे आहे अशा मानसिकतेचा निषेध करून विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान न भरून न येण्यासारखे आहे
येत्या पंधरा दिवसात नवी मुंबई महानगर पालिका प्रशासनाने विद्यार्थी हिताचा निर्णय न घेतल्यास आम्हाला जन आंदोलन उभारावे लागेल व त्यांची सुरुवात आम्ही या वर्षी सुरु होणाऱ्या शाळेच्या पहिल्या दिवसापासून 13 जून 2022 पासून उपोषणा द्वारे करणार असल्याचे जाहीर केले आहे
या पत्रकार परिषदेला डीएड बीएड स्टुडंट्स असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष संतोष मगर राज्य सचिव प्रशांत पाटील शिंदे, राज्य संघटक श्रीकांत जाधव, श्रीराम महाले, रेणुका गायकवाड, सचिन पाटील खरे, प्रकाश पल्हाळ आदी उपस्थित होते...
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम