डी वाय पाटील स्टेडियम येथे सुरु असलेल्या क्रिकेट मॅच वर बेटींग लावणाऱ्या आठ आरोपींना अटक!

नवीमुंबई ( प्रतिनीधी )  डी वाय पाटील स्टेडियम मध्ये सुरु असलेल्या गुजरात टायटन्स विरूध्द पंजाब किंग्ज या संघातील आय पी एल क्रिकेट मॅचवर स्टेडीयम मध्ये बसुनच  बेटींग लावत असलेली माहिती नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांना गुप्त खबऱ्या मार्फत मिळालेली होती त्याआधारे नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्टेडियम मध्ये  छापा टाकत आठ सट्टा बहाद्दरांना ताब्यात घेतलेले आहे. अटकेत असलेल्या आरोपी आंतरराज्य असल्याची माहिती पोलिसाकडून प्राप्त झालेले आहे या आरोपींची नावे  (१)राजुकुमार फुलचंद श्रीवास्तव , वय -३८ वर्षे रा. जौनपुर , उ . प्र  (२) अमीर सोहेल जफार अल्ली, वय (२४ )वर्षे रा.जौनपुर , उ . प्र (३)प्रशांत हेडाव  वय ३८ वर्षे रा.  खार मुंबई (४)अजय विनोदभाई दबगर , वय (२३) वर्षे रा. मेहसाना रा. गुजरात (५)हार्दीक कुमार राजेंद्रकुमार बारोत रा. मेहसाना ,गुजरात (६) संदीप षेट्टी नारब शेट्टी रा धनपाल, एसआर नगर, हैद्राबाद (७)   तिरूमला व्यकंटन नागेंद्र बाबु, रा. कडपा, आंध्र प्रदेश (८) सिमा रविशंकर, रा. कडपा , आंध्र प्रदेश. अशी असून सर्व आरोपी हे परराज्यातील आहेत.याबाबत माहिती अशी की डी वाय पाटील स्टेडियममध्ये आयपीएल क्रिकेटचे सामने सुरू आहेत हे सामने पाहण्यासाठी देशभरातील  क्रिकेट प्रेमी येत आहेत. पण या स्टेडियम मध्ये काही बेटिंग लावणारे देखील स्टेडियममध्ये बसूनच वेबसाईट चालू ठेवून टीव्हीवरच्या प्रक्षेपणाला बारा-तेरा सेकंद लागतात तेवढ्या कालावधीचा फायदा घेत बेटिंग लावत होते याची माहिती गुन्हे शाखेला मिळताच गुन्हे शाखेने बेटिंग लावणाऱ्या आठ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात भा. द. वि.420,465,467,468,471,34 इंडियन टेलिग्राफ ऑक्ट 1885 चे कलम 25 क सह इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी अमेंडमेंट अक्ट 2008 चे कलम 43, 66,84, ब त्याप्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत 

दरम्यान सदरची कामगिरी मा.अपर पो आयुक्त , पोलीस उप आयुक्त  सहाय्यक पोलीस आयुक्त , गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शना खाली  वपोनि कोल्हटकर , सपोनि देवडे , पो उप नि रेड्डी , देसाई तसेच गुन्हे शाखा प्रशासन, मध्यवर्ती कक्ष व मोटर वाहन चोरी विरोधी कक्षाचे अंमलदार केली आहे

संबंधित पोस्ट