
नवी मुंबई वाशी येथून तरुण बेपत्ता!
नवी मुंबई (प्रतिनिधी ) नवी मुंबई परिसरातील जूहुगाव वाशी याठिकाणी राहत असलेला २६ वर्ष तरुण अचानक बेपत्ता झाला आहे या तरुणाचे नाव सुमन कुमार मदनलाल टेलर असे असून त्याची उंची पाच फूट नऊ इंच मध्यम बांधा रंग सावळा नाक सरळ डोळे काळे चेहऱ्यावर दाढी असलेला तरुण हा जुहुगावात मित्रासोबत रूमकरून राहत होता तेथून तो कुणाला काहीएक न सांगता अचानक निघून गेलेला आहे याबाबतची मीसिंग तक्रार प्रमोद कुमार मदनलाल टेलर त्यांनी वाशी पोलीस ठाण्यात नोंदवलेले आहे असे वर्णन असलेल्या तरुणांची माहिती कोणाला असल्यास वाशी पोलिस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय वने यांच्याकडे भ्रमणध्वनी क्रमांक 8600909987 या क्रमांकावर कळवावे असे आवाहन वाशी पोलिसाकडून करण्यात येत आहे
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम