हंडा मोर्चाच्या इशाऱ्याची प्रभाग अधिकाऱ्याने घेतली दखल! हंडा मोर्चा स्थगित ! घनश्याम मढवी यांची माहिती
नवीमुंबई : घणसोली गाव व सेक्टर परीसरात मागील काही महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई जाणवत असून , वारंवार परीसरातील नागरीक व लोकप्रतिनिधी यांनी तक्रार अर्ज करून देखील कोणतीही सुधारणा न झाल्याने नगरसेवक घनश्याम मढवी यांनी परीसरातील नागरीकांचा धडक हंडा मोर्चा काढण्याचे पत्र प्रभाग अधिकारी यांना दिले होते
२ मे या दिवशी हंडा मोर्चा आयोजित करण्यात आला होता त्याबाबत स्थानिक रबाळे पोलीस स्टेशन तसेच महापालिका आयुक्त अभीजीत बांगर व विभाग कार्यालयाला इशारा पत्र देण्यात आले. घनसोली गावातले स्थानिक नागरिकांचा पाण्यासंदर्भात येणारा मोर्चा कधीकाळी उग्र रूप धारण करेल याची कल्पना असल्याने कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार या मोर्चा दरम्यान निर्माण होऊ नये म्हणून रबाळे पोलीस स्टेशनने मध्यस्ती करून ए.सी.पी .डी.डी.टेळे व वरीष्ठ पोलीस निरीक्षक .डी.डी.ढाकणे यांनी तात्काळ दखल घेत शनीवार दि.३०/०४/२०२२ रोजी विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके व त्यांच्या सहकाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावले अर्जदार लोकप्रतिनिधी व नागरीक यांच्या सोबत बैठक बोलावून दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले व तात्काळ सदर पाणी समस्येबाबत तोडगा काढण्यासाठी पालीका प्रशासनाला सुचना देण्यात आल्या आहेत
दरम्यान: विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके यांनी तात्काळ पाणी पुरवठा व्यवस्थित करण्यात येईल असे सांगितले व लोकप्रतिनिधी व नागरीक यांच्या सोबत सोमवार , मंगळवार पर्यंत महापालिका आयुक्त अभीजीत बांगर व शहर अभियंता संजय देसाई यांच्या सोबत तातडीची बैठक लावून सदर पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आश्वासीत केल्याने मोर्चा स्थगीत करण्याची विनंती विभाग अधिकारी तसेच पोलीस प्रशासनाने केली.
सदर विनंतीचा मान ठेवून स्थानिक शिष्टमंडळाचे प्रमुख घनश्याम मढवी यांनी मोर्चा स्थगीत करत असल्याचे स्पष्ट केले
यावेळी माजी नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील परीवहन समीतीचे माजी सभापती मोहन म्हात्रे , दिलीप म्हात्रे , केशव पाटील उपायुक्त रंजन बालाजी पाटील , समाजसेवक श्याम बाळू पाटील , नामदेव जगताप, ज्ञानेश्वर पाटील , .सिताराम मढवी, नामदेव पाटील , धर्मा भोईर, मदन सुदाम पाटील , गणेश खपके ,समाजसेवीका सौ.ललिता मढवी ,सौ.रेखा म्हात्रे ,सौ.लता मढवी उपस्थित होते.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम