सराईत चोरट्याच्या गुन्हे शाखा पोलिसांनी आवळ्या मुसक्या ! आरोपी गजाआड!.. गंगाधर देवडे यांच्या पथकाची कारवाई!
नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात अंतर्गत घरफोडी चोरीच्या घटना अधिक प्रमाणात वाढ होत असल्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांच्या निदर्शनांमध्ये आले होते त्या अनुषंगाने आयुक्त बिपिन कुमार सिंह याने आपल्या कार्यालयातील संबंधितांना सुचना देऊन घरफोडी व सोनसाखळी चोरांचा बंदोबस्त करावा असा आदेश दिले होते. त्या आदेशाचे पालन करून मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबई पोलिसांनी कारवाईसाठी पुढाकार घेऊन दिघा येथील घरफोडी प्रकरणी एका सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात यश प्राप्त केले आहे या चोरट्या कडून 2 लाख 40 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या चोरट्याचे नाव शफिक अब्दुल शेख वय वर्ष (44) राहणार घुंगट नगर तालुका भिवंडी असे आहे दुसरा आरोपी मयूर दीपक रेगे वय वर्ष (18) राहणार विटावा कोळीवाडा यांनी घणसोली मधील भाग्यश्री मोबाईल शॉपी या दुकानाचे रात्रीच्या दरम्यान सेटर तोडून 23 मोबाईल लंपास केले होते या मोबाईलची किंमत 1 लाख 10 हजार असुन या चोरट्याला देखील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घनसोली गुणाजी तलाव येथे सापळा रचून ताब्यात घेतलेले आहेयाबाबत माहिती अशी की गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली घरफोडी प्रकरणी असलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक निर्माण करण्यात आले होते गंगाधर देवडे यांनी घरफोडी प्रकरणात दरम्यान सखोल चौकशी केली असता सीसीटीव्ही कॅमेरा च्या आधारे आरोपीचा शोध घेत आरोपी शफिक अब्दुल शेख याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 2लाख 40 हजार किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले असून त्याची अधिक चौकशी केली असता दिघा विभागात दिवसा घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरल्याचे त्याने कबूली दिली आहे
दरम्यान: सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे यांनी आज पर्यंत अमली पदार्थ घरफोड्या किंवा इतर गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात यश प्राप्त केलेले आहे हा त्यांचा हातखंडा असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे या कारवाईदरम्यान पोलीस आमदार किरण राऊत मंगेश वाट विजय खरटमोल लक्ष्मण कोपरकर राहुल वाघ अजय कदम विष्णू पवार यांचा देखील सहभाग होता
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम