
महापे डी मार्ट येथील वाहनचालकाचा संशयास्पद मृत्यू ?आत्महत्या की हत्या!..
कुटुंबाची कारवाईची मागणी!..
नवी मुंबई :नवी मुंबई महापे परिसरातील डी मार्ट या विभागात कार्यरत असलेल्या वाहन चालकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे हा वाहन चालक कोपरखैरणे सेक्टर 19 मध्ये राहणारा आहे या चालकाचे नाव राजू राठोड असे आहे या घटनेने एकच खळबळ उडाली असून वाहन चालकाने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली याचे रहस्य उघड करण्याचे आव्हान तुर्भे पोलिसांपुढे उभे टाकले आहे. याबाबत तुर्भे पोलीस स्टेशन च्या संबंधिताने एफ आय आर नोंदविण्यास नकार दिला असून राठोड कुटुंबाचे म्हणण्यानुसार मयत राजू राठोड याने आत्महत्या केली नसून त्याची हत्याच करण्यात आली असल्याचा आरोप केला आहे व आत्महत्येचा बनाव रचण्यात आलेला आहे. जोपर्यंत तुर्भे पोलीस स्टेशन रीतसर एफ आय आर नोंदवून घेत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही असे कुटुंबाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
याबाबत माहिती अशी की मयत राजू राठोड हा नेहमीप्रमाणे गुरुवारी डी मार्ट येथे कार्यरत असलेल्या वेअर हाऊस मध्ये घरातून कामाला निघून गेला मात्र गुरुवारचा रात्री तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली.
शोधाशोध सुरू असतानाच राजू राठोड यांचे प्रेत गळफास लावलेल्या अवस्थेमध्ये शुक्रवारी आढळून आले सदरचा गळपास हा संशयास्पद स्वरूपाचा असल्याचा आरोप राठोड कुटुंबीयांनी केला आहे कोणाचा वाद नसल्याकारणाने मयत राजू राठोड हा कशासाठी आणि का? आत्महत्या करील! हा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांना सतवत आहे हा प्रकार घातपाताचा असून तुर्भे पोलिसांनी वेळीच एफ आय आर दाखल करून घ्यावा जोपर्यंत तुर्भे पोलीस स्टेशन एफ आय आर दाखल करून घेत नाहीत तोपर्यंत नवी मुंबई महानगरपालिका वाशी रुग्णालय येथून मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही असे मत राठोड कुटुंबाकडून व्यक्त होत आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम