माजी आमदार संदीप नाईक यांच्या उपस्थितीत 'साईबाबा भंडारा' कार्यक्रम उत्साहात साजरा.

नवी मुंबई : नवी मुंबईतील तुर्भे स्टोअर्स येथील अण्णाभाऊ साठे डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी जनकल्याण सामाजिक संस्था तर्फे 'साईबाबांचा भंडारा' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने साई भक्तांना आमंत्रित करण्यात आले होते. 

यावेळी भाजपाचे आमदार लोकनेते मा. गणेश नाईक यांचे सुपुत्र ऐरोली विधानसभा चे प्रथम आमदार प्रमुख पाहुणे मा.संदीप नाईक, यांच्या प्रमुख उपस्थितीत जनकल्याण सामाजिक संस्था. चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेशभाई शर्मा, उत्तर भारतीय मोर्चा, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष राजेश राय, वरीष्ठ नेते माजी

नगरसेवक दशरथ भगत, माजि नगरसेवक राजेश शिंदे, समाज सेवक राजेंद्र इंगले, प्रकाश गुप्ता, उमेश शर्मा आदींसह कार्यक्रमाचे आयोजक संस्थेचे राष्ट्रीय सचिव संतोष हलवाई, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इस्माईल अन्सारी आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. यावेळी माजी आमदार संदीप नाईक यांनी साईबाबांची महती सांगून हजारोंच्या जनसमुदायाला मोलाचे मार्गदर्शन केले.

दरम्यान स्थानिक कलाकारांच्या वतीने साई गीतांचा मनमोहक सुरेल कार्यक्रम सादर करण्यात आला. सुमारे तिन हजार साई भक्तांनी या प्रसादाचा लाभ घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व महिला पुरुष कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमात स्थानिक रहिवाशां सह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

संबंधित पोस्ट