
पाण्याच्या टाक्या साफ करणाऱ्या दोन मजुरांचा गुदमरून मृत्यू ! ठाण्यातील दुर्दैवी घटना!
नवी मुंबई (प्रतिनिधी) उन्हाळ्यात पाण्याच्या टाक्या साफ करण्यासाठी इमारतीमधील रहिवाशी कोणत्या ना कोणत्या तरी ठेकेदाराला पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यासाठी काम देत असतात मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे व योग्य साधन सुविधा नसल्याकारणाने मजुरांचा नहक बळी जात असलेल्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत अशीच दुर्दैवी घटना शनिवारी ठाणे हरिनिवस सर्कल शेजारील मराठा मंडळ सांस्कृतिक केंद्राच्या इमारतीवरील पाण्याच्या तीन टाक्या साफ करण्यासाठी गेलेल्या मुजरा बाबतीत घडलेली आहे त्यात दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे
याबाबत माहिती अशी की ठेकेदार अरुण निंबाळकर याने 4 कामगारांना टाकीमध्ये उतरविले होते,टाकी साफ करण्याआधी त्यात विषारी रसायन टाकले गेले ,त्याचा गॅस निर्माण होऊन टाकी मध्ये पसरला,त्याची प्राथमिक जाणीव न झाल्याने योगेश नरवणकर वय (36) विवेक कुमार मंडल वय (30) हे दोन कामगार आत उतरले परंतु त्यांना श्वास घेण्यास त्रास होवू लागल्याने त्यांनी बचावासाठी आरडाओरड केली असता टाकीवरील दोन मजुरांनी त्यांना वर काढण्याचा प्रयत्न केला परंतु प्रॉपर शिडी सुरक्षा बेल्ट, दोरखंड आणि इतर सुरक्षा साधने तेथे नसल्याने वरील मजूर देखील भांबावले अश्या भीतीदायक वातावरणात आतील दोघांचा गुदमरून मृत्यू झाला तर त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असलेल्या दोघांची प्रकृती गंभीर आहे, चराई येथील संपदा हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत
दरम्यान: मृत्यू पावलेले मजूर मागास घटकातील आहेत,त्यांच्या वारसांना योग्य नुकसान भरपाई मिळावी आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी प्रा चंद्रभान आझाद यांनी केली आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम