सर्वसामान्य नागरिकांना दलित पॅंथर आपली ओळख निर्माण करून देईल!.. बाळासाहेब पडवळ
नवी मुंबई : देशातल्या कष्टकरी शोषित पीडित नागरिकांना दलित पँथर आपला आवाज समजून सर्वांना समान आणि सारखा न्याय मिळवून देण्यासाठी कटिबंध आहे त्यासाठी दलित पॅंथर ला दुबळ्या शोषीत कष्टकरी समाजाने अधिक बळ देऊन दलित पॅंथर ची ताकत मोठ्या प्रमाणात निर्माण करावी असे आवाहन दलित पँथरच्या वतीने चेंबूर मुंबई येथे आयोजित केलेल्या सामाजिक न्याय परिषदे मध्ये उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दलित पँथर चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्याचे दलित पँथरचे अध्यक्ष डॉक्टर घनशाम भोसले यांनी महा विकास आघाडी च्या धोरणावर प्रचंड टीका करून शैक्षणिक आरोग्य नोकरी धंदा याबाबत आपले मत व्यक्त करताना त्यांनी सरकावरा निशाणा साधून राज्य सरकार व केंद्र सरकार हे कष्टकरी दलित विरोधी आहे हे पटवून देऊन जर बहुजनांच्या मुलांना तरुणांना आपले हक्क अबाधित राखायचे असल्यास सुशिक्षित तरुणाने दलित पँथर या संघटनेची कास धरावी त्यातच येणाऱ्या पिढीचे भविष्यात हित आहे अन्यथा गुलामगिरीचे दिवस माथ्यावर येण्यास जास्त दिवस लागणार नाहीत असे रोखठोक मत डॉक्टर घनश्याम भोसले यांनी व्यक्त केले.
दरम्यान या परिषदेमध्ये दलित पँथर चे राष्ट्रीय सरचिटणीस तथा प्रवक्ता राजेश सोनवणे यांनी आपल्या भाषणामध्ये सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली असून वेळप्रसंगी धनंजय मुंडे हटाव समाज कल्याण खाते बचाव ही मोहीम दलित पँथरच्या वतीने राबविली जाईल असा इशारा देखील या परिषदेदरम्यान दिला आहे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जगदिश इंगळे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुभाष लाटकर दलित पँथर ठाणे जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख सुनील गायकवाड, महाराष्ट्राच्या महिला सरचिटणीस रमाताई अहिरे, राष्ट्रीय संघटक जितू राजबार मुंबई सरचिटणीस प्रकाश निकाळजे,उपाध्यक्ष जुबेर सिद्दिकी, उज्वला वर्मा ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईची अध्यक्ष निलेश भोसले ,मुंबई कार्याध्यक्ष अशोक पवार, महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी सचिव बाई एम पी बन्सवाल, या सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन मुंबई प्रदेशाध्यक्ष रोहित भंडारी यांनी केले होते त्या परिषदेदरम्यान रितीक कांबळे यांचा भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक न्याय परिषद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान डॉक्टर घनशाम भोसले यांनी भूषविले सूत्रसंचालन दलित पँथरचे जगदीश भाई इंगळे यांनी केले

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम