जादूची कांडी फिरवणारा कोणी येणार नाही यशस्वी होण्यासाठी स्वतः संघर्ष करावाच लागेल !... रामदास आठवले
नवी मुंबई : स्पंधन अर्बन निधी लि. नवी मुंबई च्या प्रथम शाखेचा उद्घाटन समारंभ रामदास आठवले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री. भारत सरकार यांच्यासह ऐरोली विधानसभेचे विद्यमान आमदार गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत 8 मार्च रोजी मोठ्या थाटामाटात हावरे फेंटेसीया मॉल येथे पार पडला. जादूची कांडी फिरवणारा कोणी येणार नाही यशस्वी होण्यासाठी संघर्ष करावाच लागेल. कोरोना काळात झालेल्या आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करून द्यावा व नवीन उद्योजक निर्माण व्हावे यासाठी स्पंधन अर्बन निधी लि. निधी उपलब्ध करून देणार आहे. अशा स्तुत्य उपक्रमासाठी मी त्यांच्या पाठीशी उभा आहे व जागतिक महिला दिनी अशा उपक्रमाची सुरुवात केल्याबद्दल संचालक मंडळाचे कौतुक केले व उपस्थिताना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
त्याचप्रमाणे कविमनाचा भावनिक माणूस आणि चळवळीमध्ये सातत्याने सक्रिय असून अर्ध्या रात्री धावून येणारा सर्वधर्मसमभाव सामावून घेणारा एक उमदा नेता म्हणून आज रामदास आठवले यांची ओळख आहे असे प्रतिपादन आमदार गणेश नाईक यांनी केले. नव्या मुंबईत युवकांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी स्पंधन नामक हा उपक्रम बहुजनांसाठी बहुपयोगी आहे. नव्या मुंबई कोणत्याही प्रकारची अडचण भासल्यास आपण मला संपर्क साधावा असे आवाहन करीत आमदार गणेश नाईक यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच 'मासोळी' उपक्रमा अंतर्गत मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र सहित मासे विक्रीचे स्टॉल्स महिलांना उपलब्ध करून देण्यात आले.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते सुरेश बारशिंगे, जगदीश गायकवाड, सिद्राम ओहोळ जिल्हा अध्यक्ष आरपीआय (आठवले गट), यशपाल ओहोळ, युवा जिल्हा अध्यक्ष विजय कांबळे, युवा सचिव सचिन कटारे, माजी नगरसेवक सुरज पाटील, लोककवी प्रशांत मोरे, अभिनेते कुणाल मेश्राम, संचालक मंडळाचे संदेश उघडे, रुपाली मोरे, उज्वला पाडळे, नितीन कांबळे, रेणुका उनवणे, उषा कदम आदींसह पत्रकार राजा अदाते, साप्ताहिक उद्योग नगरीचे मोहन वाघमारे व अनेक मान्यवर उपस्थित होते. या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन स्पंधनचे चेअरमन व आरपीआय रोजगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत जगताप यांचे नेतृत्वात करण्यात आले होते.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम