पहिली ते चौथी हे वर्ग ऑनलाईन पद्धतीने घेण्याची रिपब्लिकन पक्षाची मागणी!

नवी मुंबई : राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे नवी मुंबईतील अनेक शाळांनी पालक वर्गाला आपल्या पाल्याला शाळेमध्ये शैक्षणिक वर्षासाठी आणण्याची सूचना पालकांना समाज माध्यमातून केली होती या अचानक सूचनांचे  पालन करताना पालकांची तारांबळ उडाली आहे. 

वय वर्ष पाच ते पंधरा वर्षाच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले नाही तरी शिक्षण संस्था अश्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्याबाबत सक्ती करत असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने केला आहे याबाबत आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी  विरोध केला असून नवी मुंबईतील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी चे वर्ग आणि परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच सुरू ठेवा

नवी मुंबई महानगरपालिकेने अद्याप शाळांबाबत आदेश दिले नसताना मनमानी कारभार करणाऱ्या शिक्षण संस्थांना समज देऊन योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी देखील आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे

 दरम्यान: वाशीतील सेंट मेरी शाळे शेजारीच महानगर पालिकेचे भव्य रुग्णालय असून सदर शाळा सुटण्याच्या वेळेला सदर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून यामुळे रुग्णांना त्रास होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे गंभीर रुग्ण वाटेतच दगावण्याची शक्यता आहे तरी सदर शाळेने याबाबत योग ती काळजी घ्यावी व तशी सूचना महानगरपालिकेने शाळा व्यवस्थापनाला द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले) नवी मुंबई सरचिटणीस एल. आर. गायकवाड, युवक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नारायण मोरे आणि आयटी सेलचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सचिन कटारे यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.

संबंधित पोस्ट