नवी मुंबईत एकाच परवान्यावर दोन ठिकाणी व्यवसाय - दोषींवर कारवाई करण्याची सामाजिक कार्यकर्ते प्रदीप कणसे यांची मागणी !

नवी मुंबई(प्रतिनिधी) : नवी मुंबईत वाढती बेरोजगारी पाहता महानगरपालिकेने शहरात परवाने वाटप करून व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याच पार्श्व - भूमीवर काही परवानाधारकांनी एकाच परवान्यावर दोन ठिकाणी बिनबोभाटपणे व्यवसाय करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

वाशी सेक्टर क्रमांक २६ येथील सिडबी कॉम्प्लेक्स च्या बाहेर रस्त्याच्या लगत स्टॉल क्रमांक २२ ज्युस सेंटर नावाने आहे याशिवाय फ्रुट मार्केट च्या गेटच्या उजव्या दिशेला रोडच्या लगत बस स्टॉप च्या बाजूला २२ क्रमांकाचा स्टॉल फास्टफूड म्हणून पहावयास मिळत आहे. अधिकृत फेरीवाले परवाने वितरीत करून फेरीवाल्यांना जागा निश्चित करून देण्यात आल्या आहेत.


त्यानुसार परवानाधारकांना व्यवसाय करणे बंधनकारक आहे. मात्र ए.पी.एम.सी. मार्केट येथे परवान्यांचा सर्रास गैर प्रकारे वापर करण्यात येत असून खाद्यपदार्थ विक्री च्या नावाने असलेल्या परवान्यावर गुटखा सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ विक्रीचा व्यवसाय बेधडकपणे करण्यात येत आहे. बोगस परवाना धारकांच्या अशा प्रकारांमुळे महानगरपालिकेची दिशाभूल केली जात असल्याचे चित्र दिसत आहे. दोषींवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी सहाय्यक आयुक्त तुर्भे विभाग यांच्या कडे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप कणसे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे

संबंधित पोस्ट