ए.पी.एम.सी. मध्ये पत्र्याची शेड रस्त्याच्या कडेला बांधल्याने वाहतूक कोंडी नागरिकांकडून संताप!

नवी मुंबई  : ए.पी.एम.सी. मार्केट फ्रुट मार्केट चा गेट समोरील फ्रुट मार्केट ते भाजी मार्केट रोड च्या कडेला कोरोना च्या पार्श्वभूमीवर फेरीवाल्यांनी धंदे करू नये याकरिता पत्र्याची शेड लावण्यात आली आहे याशिवाय तेथे सुरक्षा रक्षकांचा पहारा ही देण्यात आला आहे. परंतु या परिसराची पाहणी केल्यास पत्र्याचा शेड हा सर्व नवी मुंबई महानगरपालिकेने बनाव केला असल्याचे चित्र दिसत आहे.

या बाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माहीत अशी  की पंचक्रोशी चौकातील आरटीओ चौकी लगतच फ्रुट मार्केट चौक ते भाजी मार्केट शेड बांधण्यात आली असल्याने रस्ता अरुंद होऊन ट्रॅफिक जाम होत आहे, याशिवाय ॲम्बुलन्स जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे, वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना काम करताना अडचण होत असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


वाहतूक पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेस पत्रव्यवहार करून अडचण दूर करण्याची विनंती वारंवार करूनही पालिकेने विनंतीस केराची टोपली दाखवली असल्याची माहीती समोर आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने शेड बांधली असली तरीही फेरीवाल्यांचे धंदे रस्त्याच्या कडेला लागलेले दिसूनच येत आहेत व नाममात्र अतिक्रमणाची गाडी रिकामी उभी केली जात आहे  सुरक्षा रक्षक बघ्याची भूमिका घेत बसले आहेत. 

दरम्यान सदरच्या घटनेची दखल घेत दि १३ डिसेंबर २१ रोजी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटने ते संस्थापक अध्यक्ष . राहुल भैया दुबाले यांच्या आदेशानुसार नवी मुंबई कार्यकारणीच्या शिष्टमंडळाच्या वतीनेही नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे 'डी' विभाग कार्यालयास निवेदन देण्यात आले.


या शिष्टमंडळात नवी मुंबई शहराध्यक्ष मयूर कारंडे, महिला शहराध्यक्ष नवी मुंबई करपे, शहर उपाध्यक्ष उमेश पाटील, शहरसचिव प्रदीप कणसे, युवक शहराध्यक्ष गौरव धाये, युवक शहर सचिव विवेक पाटसकर, संपर्कप्रमुख अनंतराज गायकवाड आदींनी सहभाग घेतला होता. यावेळी प्रशासनाने कानाडोळा केल्यास महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला होता. परंतु झोपेचे सोंग घेतलेल्या महानगरपालिकेने अद्याप कोणतीही दखल घेतलेली दिसून येत नसल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.

संबंधित पोस्ट