
ए.पी.एम.सी. फक्त ५० किलोच वजन उचलण्याचे शासकीय निर्देश.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती च्या नवी मुंबईतील मार्केट परिसरात आंतरराष्ट्रीय श्रम संघटना व राज्य शासनाने काढलेल्या आदेशान्वये कांदा बटाटा मालाचे वजन ५० किलोच ठेवण्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे पणन विभागाने परिपत्रक काढावे व त्या परिपत्रकानुसार पणन संचालक, जिल्हा उपनिबंधक, बाजार समितीचे सभापती/ सचिव यांनी व्यापारी असोसिएशन व संबंधितांना परिपत्रकाद्वारे अंमलबजावणी करण्याच्या सूचना द्याव्या.
आंतरराष्ट्रीय समाज संघटनेने घेतलेल्या निर्णयानुसार केंद्र सरकार व राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी केल्यानुसार मालाचे वजन ५० किलो च ठेवण्याबद्दल अंबलबजावणी होते किंवा नाही याची देखील तपासणी करावी असे आदेश राज्याचे पणन मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांचे समोर दि. ८ डिसेंबर २०२१ मंत्रालयात झालेल्या सर्व संबंधितांच्या बैठकीत दिले होते, त्यानुसार पणन संचालनालय पुणे यांच्या कार्यालयाने परिपत्रक जारी केले.
मंत्री महोदय यांनी दिलेला शब्द पाळला त्याबद्दल महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि माथाडी जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस माजी आमदार मा. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी आभार व्यक्त केले, मात्र ५० पेक्षा जास्त येणाऱ्या मालाची हाताळणी केली जाणार नाही याप्रमाणे सर्व संबंधित घटकांनी अंमलबजावणी करावी अशी विनंतीही केली आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम