कोविड मदत कक्ष वाखरी तर्फे विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या खेळाडूंचा सत्कार
- by Reporter
- Dec 13, 2021
- 669 views
वाखरी : कोविड मदत कक्ष वाखरी तर्फे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी हनुमान तालीम संघ वाखरीच्या ज्या खेळाडूंनी विविध स्पर्धेत आपले प्रावीण्य दाखविले अशा खेळाडूंचा यथोचित सत्कार करण्यात आला. यामध्ये कु.प्रज्ञा ढेकळे हिची" खेलो इंडिया"अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय सराव निवड चाचणी मध्ये निवड झाले बद्दल कोविड मदत कक्ष वाखरी यांचे वतीने प्रोत्साहन पर फेटा हार व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
तसेच या चाचणी मध्ये टाॅप ११ खेळाडूंचा तसेच कुस्तीमध्ये चमकदार कामगिरी करून विविध गटात चॅम्पियनशीप मिळविणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.खेळाडूंना प्रशिक्षण देणारे वस्ताद संदीप शेंडगे,प्रमोद शिंदे स्वप्नील ढेकळे यांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी कुंभार सरांनी भविष्यात वाखरीतील खेळाडू चमकदार कामगिरी करतील अशी आशा व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या .ढेकळे गुरुजींनी वाखरी गावातील विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या ग्रामस्थां बद्दल गौरोउद्गागार काढून जय हनुमान तालीम संघाचे खेळाडू ऑलंपिकला गवसणी घालतील अशी आशा व्यक्त करुन गुणी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम कोविड मदत कक्ष यापुढेही सातत्याने करणार असल्याचे सांगितले. माजी सभापती रामभाऊ ढेकळे यांनी व तुकाराम गरड सरांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमासाठी कोविड मदत कक्षाचे सदस्य रामभाऊ ढेकळे, विलास गरड ,काशिनाथ ढेकळे, शिवाजी गुरव,राजाभाऊ तांबे,कृष्णात कुंभार गुरूजी,दत्तात्रय मोहिते गुरूजी,ढेकळे गुरूजी, भानुदास ढेकळे,जयेश ढेकळे,गोविंद मोहिते गुरूजी,तुकाराम गरड गुरूजी,रमेश मोहिते गुरूजी व पालकामधून दादासाहेब ढेकळे,गणपतराव ढेकळे प्रविण ढेकळे, यशवंत तांबे, घनवट , राजेंद्र सूळ, मनोज तांबे, राहुल ढेकळे फौजी व सर्व खेळाडू व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी खेळाडूसाठी केळी व सफरचंदाचे वाटप करण्यात आले. दत्तात्रय मोहिते गुरूजींनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
रिपोर्टर