सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात कार्यक्रमाचे आयोजन!..

नवी मुंबई  :  परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र यशवंतराव  तथा भैय्यासाहेब आंबेडकर यांची १०९ वी जयंती रिपब्लिकन सेना द्वारा नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात शुक्रवारी दिनांक १०/१२/२०२१ रोजी दुपारी तीनच्या सुमारास आयोजित करण्यात आलेली आहे.

या जयंतीला  सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये जयंतीचा कार्यक्रम  रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्याने आयोजित केलेला आहे 

नवी मुंबई येथील आंबेडकरी अनुयाहिंनी जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात उपस्थित राहावे  असे आव्हान रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबईतील ज्येष्ठ नेते अशोक जमदाडे यांनी केले आहे

दरम्यान:  या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमास शाहिरी जलसा उदान कार्यक्रमाचे सादरकर्ते बाळासाहेब आटखिळे यांच्या शायरी जलसाचे  आयोजन देखील रिपब्लिकन सेनेने केलेले आहे.

संबंधित पोस्ट