नवी मुंबई कोपर खैराने विभागात काँग्रेस पक्ष वाढवण्याची जबाबदारी माझी ! धोंडीराम पाटील

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका लक्षात घेऊन नवी मुंबई काँग्रेस जिल्हा कमिटी नवी मुंबई पालिका  क्षेत्रा अंतर्गत  मोठ्या प्रमाणात कामाला लागले असून प्रत्येक विभागातील वार्ड बांधणीला काँग्रेस पक्षाने सुरुवात केल्याचे चित्र नवी मुंबई मध्ये दिसत आहे.

कोपरखैरणे सेक्टर १९ या ठिकाणी कॉंग्रेस पक्ष कार्यालयाचे उद्घाटन नवी मुंबई जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माजी उप महापौर अनिल कौशिक यांच्या हस्ते मंगळवारी मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक बाबासाहेब गायकवाड चंद्रकांत पाटील सुनील पारकर अभिजीत काकडे इत्यादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते 

दरम्यान: नवी मुंबई काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक यांनी माझ्यावर कोपर खैरना तालुका अध्यक्ष म्हणून जी जबाबदारी दिली आहे ही जबाबदारी मी आज पर्यंत चांगल्या रीतीने पार पाडत आलेलो आहे, यापुढेही कोपरखैरणे विभागात कॉंग्रेस पक्ष चांगल्या रीतीने वाढविण्याचे मी काम करेल येत्या पालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष ला ज्या जागा वाट्याला येतील त्या जागे वरील उमेदवार पालिकेच्या सभागृहात दिसल्याशिवाय राहणार नाहीत असा आशावाद धोंडीराम पाटील यांनी व्यक्त करून कोपर खैरणे तालुक्यात काँग्रेस पक्ष वाढवण्याची जबाबदारी माझी आहे हे असे प्रतिपादन पाटील यांनी केले

संबंधित पोस्ट