
ना जातीसाठी ना पातीसाठी एक दिवस पोलिसांसाठी ,आज इतिहासाचे साक्षीदार झालो गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
नवी मुंबई : २६/११ च्या झालेल्या भ्याड हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेला अनेक नागरिक गंभीररीत्या या हल्ल्यातून जखमी झाले. दहशतवाद्यांना प्रतिकार करताना कर्तव्यावर असलेले महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी देखील या घटनेमध्ये शहीद झाले. या घटनेला तेरा वर्ष पूर्ण होत असून निषपाप बळी गेलेल्या नागरिकांचा व शहीद पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी,यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे गेट वे ऑफ इंडिया मुंबई येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आपल्या भाषणात म्हणाले की मी "आज" इतिहासाचे साक्षीदार झालो" असे मार्मिक भाष्य पोलिसांच्या सन्मानार्थ गृहमंत्र्यांनी केले. यावेळी गृहमंत्री दिलीपजी वळसे पाटील व महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष .राहुल दूबाले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वीर जवानांना श्रद्धांजली देण्यात आली.
या कार्यक्रमास पोलीस परिवार व मुंबई सह नवी मुंबई,पालघर ठाणे व रायगड येथील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
संस्थापक अध्यक्ष राहुल भैया दुबाले यांनी केलेल्या आवाहना नुसार नवी मुंबईतील जिल्हाध्यक्ष मयूर कारंडे यांच्या नेतृत्वात वाशी, तुर्भे, जुईनगर, नेरुळ येथे ऑन ड्युटी पोलिसांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय एपीएमसी पोलीस स्टेशन वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार सतीश गिरासे यांनी डोंबिवलीतील रुपेश सावंत दाम्पत्यांना सुखरूप पणे कार्यतत्परता दाखवत वाहतुकीच्या अडचणीतून मार्गक्रमण करून दिल्याने बाळंतपण यशस्वी झाले त्यांचा सावंत दाम्पत्य कडून सत्कार करण्यात आला. या वेळी नवी मुंबईतील महिला शहराध्यक्ष रुचिता करपे, उपाध्यक्ष उमेश पाटील, सचिव प्रदीप कणसे, सल्लागार मंगेश काळेबाग, युवक आघाडी अध्यक्ष गौरव धाये, घणसोली विभाग प्रमुख विराज यादव यांच्यासह नवी मुंबईतील पदाधिकारी उपस्थित होते.
हा उपक्रम महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे राज्यातील ३३ जिल्ह्यामध्ये राबवण्यात आला.२६/११ च्या हल्ल्यामध्ये पोलिसांकडे अत्याधुनिक शस्र नसतानासुद्धा खूप हिमतीने आपल्या जीवाची बाजी लावून देशाचे रक्षण केले. त्यांच्या बलिदानाची आठवण कायम रहावी व पोलीस कर्मचार्यांनाचा जनतेने कायम सन्मान करावा असा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम