
घनसोली कोपरखैरणे मध्ये द ब्राईट लॉन्ड्रीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांच्या हस्ते उद्घाटन !
नवी मुंबई : घनसोली कोपरखैरणे सेक्टर एक मध्ये द ब्राईट लॉन्ड्रीचे भव्य उद्घाटन कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
घनसोली कोपरखैरणे मध्ये प्रथमच मराठी तरुणाने या उद्योगाची स्थापना केली असून या लॉन्ड्री मध्ये एकाच वेळी एक मशीन अंतर्गत 20 किलो स्वच्छ कपडे धुण्याचे व जलद गतीने सुकण्याची सोय आहे.
या बाबत या ब्राईड लॉन्ड्री उद्योगाचे संचालक योगेश नेरकर,उमेश पाटील व रुक्मिणी जोशी यांना संयुक्तपणे विचारले असता त्यांनी सांगितले की लॉन्ड्री या धंद्यात विशेषता बाहेरील राज्यातील व्यवसायिक मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात मात्र आपण महाराष्ट्रातील मराठी माणसाने सुद्धा अशा प्रकारच्या व्यवसायात उतरून आपल्या व्यवसाय प्रगतशील केला पाहिजे म्हणून आम्ही लॉन्ड्री उद्योगाकडे आकर्षित होऊन व्यवसाय सुरू केलेला आहे .
बाहेर राज्यातील व्यवसायिक लॉन्ड्री व्यवसायात मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत ही मक्तेदारी मराठी उद्योजकाने मोडीत काढली पाहिजे हा उद्देश ठेवून आम्ही या व्यवसायात प्रामाणिक पणे आलेलो आहोत.
दरम्यान या उद्घाटनाप्रसंगी अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस निरीक्षक योगेश देशमुख, आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीराव आवटे पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी उपस्थित राहून या मराठी उद्योजकांना शुभेच्छा दिल्या.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम