अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीचे लवकरच वाजणार बिगुल .

अंबरनाथ(प्रतिनिधी) :  अंबरनाथ नगरपालिका सार्वत्रिक २०२१ ची निवडणूक येत्या मार्च अखेरीस किंवा एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता असुन  या निवडणूक प्रक्रिये करीता नगरपालिकेच्या सभागृहात मतदार याद्या विक्रीसाठी  ठेवण्यात आल्या आहेत ,

अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या निदर्शनास आले आहे की सदर मतदार याद्या मध्ये  नावाचा प्रचंड  घोळ झाला आहे, जे मतदार त्या प्रभागात राहत नाही अशा  १५० पासून ते ४५०  बोगस नांवे मतदार यादीत  समाविष्ट करण्यात आले आहे, तर सरासरी ५७  प्रभागा मधील मतदार याद्या मध्ये ३०  ते ३५  हजार बोगस नावे छापण्यात आली आहे असा आरोप  पत्रकार परिषदेत प्रदीप पाटील यानी केला आहे . 

निवडणूक अधिकारी,मुख्याधिकारी, तहसीलदार व राज्य निवडणूक आयोगाने सदर बोगस नावे मतदारयादीतुन वगळण्यात यावीत अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने उपोषण अथवा तीव्र आंदोलन करण्यात येणार आणि  जर या याद्या  मधील घोळ संपवला नाही  तर  काँग्रेस पक्ष न्यायालयात जाणार असा ही इशारा  प्रदीप पाटील यांनी दिला  आहे.

प्रदीप पाटील यांनी पुढे सांगितले की एकूण बहुतेक सर्व प्रभागातील मतदार याद्या मध्ये उपऱ्या मतदारांची नांवे १५०   ते ४५०  बोगस नांवे छापण्यात आली आहेत . 

मतदार याद्या तील हरकती घेण्याची मुदत  फार कमी देण्यात आली आहे मतदार याद्या १५   फेब्रुवारी रोजी प्रकाशित करण्याचे जाहीर केले असुन  २  दिवस उशिराने याद्या प्रकाशीत करून विक्री करीता ठेवण्यात आल्या. विविध  पक्ष प्रमुख व इच्छुक उमेदवारांनी मतदार याद्या तपासल्या असताना आपल्या प्रभागात सुमारे १५०  ते ४५०  बोगस मतदारा ची नावे मतदार याद्या मध्ये छापण्यात आल्याचे लक्षात आले

अंबरनाथ शहरातील पूर्व भागात राहणाऱ्या मतदारांची नावे पश्चिम भागात आणि .  पश्चिम भागात राहणाऱ्या मतदारांची नावे पूर्व भागातील मतदार याद्यांत त्या शिवाय कल्याण, भिवंडी, टिटवाळा, फळेगाव, सोलापूर,कोल्हापूर,तामिळनाडू, सुरत वलसाड येथील मतदारांची नावे  अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीतील मतदार याद्या मध्ये समाविष्ट केली आहे.

सदर घोळ कोणी केला याचा शोध त्वरित घेण्यात यावा असे  प्रदीप पाटील यांनी सांगितले आहे 

हरकत घेण्याची अंतिम तारीख २२  फेब्रुवारी आहे आमच्या हरकती सुधारून नवीन मतदार यादी   कधी मिळेल फार कमी वेळेत हा बोगस मतदार नावाचा घोळ व्यवस्थित होणार का ? यात शंका आहे.शेवटच्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीतील मतदार यादी ही व्यवस्थित होती मग आता ह्या याद्या मध्ये नावाचा घोळ करणाऱ्यांवर मग तो कोणत्याही पक्षाचा अथवा अधिकारी असेल तर त्याच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे,

आगामी नगरपालिकेच्या निवडणुका लोकशाही पद्धतीने व्हायला पाहिजे की बोगस मतदाराच्या मतदानाने करण्यात  कोणाचा फायदा आहे याचा ही शोध घेण्यात यावा.

जर मतदार याद्या दुरुस्त करून सुरळीत करण्यात आल्या नाहीत तर शांततेत आंदोलने करणार,व त्यानंतर न्यायालयात ही जाणार असे अंबरनाथ काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी सांगितले आहे,

संबंधित पोस्ट