सामाजिक उत्तरदायित्वाच्या परिपूर्तीसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन ...

नवी मुंबई :२१ फेब्रुवारी रोजी  आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर जी यांच्या संकल्पेतून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद म्हणून हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे.  

" खरा श्रीमंत तोच असतो जो समाजाला दान करतो " अशी शिकवण आपल्या अनुयायांना देणाऱ्या आपल्या गुरूच्या सूचनेनुसार  नवी मुंबई आर्ट ऑफ लिव्हिंग च्या वतीने नवी मुंबई व पनवेल परिसरात एकूण ६ ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे . 

न भूतो ,ना भविष्यते अशा कोरोना  साथी मुळे आपल्या सरकारी रुग्णालयांना  वर्तमानात मोठ्या प्रमाणात  रक्ताची तीव्र टंचाई भेडसावत आहे. सरकारने  अनेक वेळा समाजाला रक्तदान  करण्याचे आवाहन केलेले आहे .  काळाची गरज ओळखून आपणही या रक्तदान शिबिरात सहभागी व्हा

आर्ट ऑफ लिव्हिंग, नवी मुंबई तर्फे दि. २१ फेब्रुवारी, (रविवार) २०२१ रोजी सकाळी ९ ते २ यावेळेत  घणसोली ,वाशी, नेरुळ ,खारघर ,पनवेल आणि नवीन पनवेल या ठिकाणी  रक्तदान शिबिर आयोजीत करण्यात आले आहे. मानवतावादी सेवेला योगदान देण्यासाठी  इच्छुकांनी  पुढील  दिलेल्या  लिंकवर क्लिक  करून  नाव नोंदवण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे .

 नाव नोंदवण्यासाठीची लिंक :  

 https://tiny.cc/21FebDonateBlood

साईबाबा मंदिर सेक्टर  - १२  घणसोली बस  डेपोसमोर घणसोली ; 

वाशी ज्ञानमंदिर  १७७ पहिला मजला  सतरा  प्लाझा पाम बीच रोड सेक्टर - १९ डी


 रामाश्रे सोसायटी  प्लॉट २१ सेक्टर १९ नेरुळ पूर्व  डी मार्टच्या समोर  नेरुळ  ; 

खारघर क्लब हाऊस अधिराज गार्डन सेक्टर - ५ ;

आराध्याम आयुर्वेदिक चिकित्सलय पहिला मजला  मंगलमूर्ती कृपा परेडश अली  महाराणा प्रताप रोड पनवेल ;


आणि भुसारे वृद्धाश्रम सिडको कार्यालयासमोर सेक्टर - १ नवीन पनवेल

या ६ ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे .

९३७२०८१८१३ / ८४५२९१६९१३ या क्रमांकावर अधिक माहितीसाठी संपर्क साधावा .

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट