राज्यांतर्गत पॅसेंजर-एक्स्प्रेस सेवेत वाढ करा,उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाची मागणी .

बदलापूर (प्रतिनिधी) कोरोना महामारीच्या कारणांमुळे तब्बल अकरा महीने बंद ठेवलेल्या पॅसेंजर व एक्सप्रेस गाड्या रेल्वेने त्वरित सुरु कराव्यात अशी मागणी रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने मध्य रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे आंतरराज्यीय विमान सेवा, रेल्वे सेवा व सार्वजनिक बस सेवा कोविड नियमांचे पालन करीत सुरु असताना या सर्व महाराष्ट्र राज्यांतर्गत रेल्वे गाड्या का बंद ठेवता?असा सवाल महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर शेलार यांनी उपस्थित केला आहे.

अनलॉकच्या प्रक्रियेत अनेक निर्बंध शिथिल झाले आहेत.बाजारपेठा कार्यालये मनोरंजन केंद्रे खासगी व सार्वजनिक वाहतूक अशा सर्वच ठिकाणी नागरिक पुर्ववत गर्दी करीत आहेत.प्रत्यक्ष कोरोनापेक्षा त्याची भीती लोकांनी झुगारल्याचे चित्र आहे.शाळा महाविद्यालये सुरु होत आहेत.लोकल सेवेतही सर्वसामान्य लोकांना अशांत  का होईना 

प्रवास परवानगी राज्य शासनाने दिली आहे.ही सर्व परिस्थिती  पाहता रेल्वेने लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या सेवेमधे त्वरित वाढ करुन सामान्य जनतेला दिलासा द्यावा,अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व मध्य रेल्वे उपनगरीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे माजी सदस्य मनोहर शेलार यांनी केली आहे. मध्य रेल्वेकडुन चालविल्या जाणाऱ्या भुसावळ, पंढरपुर, शिर्डी, विजापूर, रत्नागिरी, सावंंतवाडी, पनवेल- पुणे या सर्वसामान्य जनतेला सुविधाजनक असलेल्या व परवडणाऱ्या  पॅसेंजर गाड्या अजूनही सुरु झालेल्या नाहीत.तसेच डेक्कन व सिंहगड एक्सप्रेस, मुंबई नांदेड़ राज्यराणी एक्सप्रेस या रेल्वेला चांगला महसूल देणाऱ्या महत्वाच्या जलद सेवा आजही बंद आहेत.

रस्ते वाहतूक ही खर्चिक व अधिक धोकादायक झाली असुन अपघात वाढत आहेत वरील सर्व परिस्थिती पाहता  पॅसेंजर व एक्सप्रेस तात्काळ सुरु कराव्यात, अशी आपली मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

वरील सर्व सेवा मध्य रेल्वे प्रशासनाच्या कार्यक्षेत्रातील असुन त्या सुरु करण्यासाठी राज्य शासनाच्या परवानगीची गरज नाही शिवाय आम्ही शंभर टक्के सेवा सुरु करण्यास सज्ज आहोत असे रेल्वेचेही म्हणणे आहे. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने या सर्व गाड्यांची वाहतूक कोविड निर्बंधांचे पालन करत त्वरीत सुरु करावी अशी मागणी मध्य रेल्वेच्या महाप्रबंधक व परिचालन प्रबंधक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याचेही मनोहर शेलार यांनी स्पष्ट केले.

संबंधित पोस्ट