बदलापुर पत्रकार सुरक्षा समिती कडुन पत्रकार कक्षा करिता बेमुदत उपोषण .

बदलापुर(प्रतिनिधी) : बदलापुर येथील पत्रकाराना नगरपालिकेत बसण्या करिता कक्ष नसल्याने  पत्रकाराना वेगवेगळ्या कार्यालयाचा आसरा घ्यावा लागतो . त्यामुळे पत्रकाराना स्वतंत्र पत्रकार कक्ष मिळावा म्हणुन बदलापुर पत्रकार सुरक्षा समिती च्या वतीने नगरपालिके च्या प्रवेश द्वारा समोर बेमुदत उपोषण करु केले आहे . 

बदलापुर शहरातील पत्रकाराना बसण्या करिता कोठे ही व्यवस्था नाही . तर पत्रकाराना नगरपालिकेत वार्तांकन करण्या करिता जावे लागते.  परंतु  पत्रकार  कक्ष नसल्या मुळे पत्रकाराना अलग अलग कार्यालयाचा आसरा घ्यावा लागतो . तर अनेक वेळा पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पत्रकार कक्षाची मागणी करुन सुध्दा नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे पत्रकार कक्ष देण्यास टाळाटाळ करत आहेत . म्हणुन पत्रकार सुरक्षा समिती  ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे . सरचिटणीस प्रदिप रोकडे यांच्या नेतृत्वाखाली बदलापुर पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष भरत कारंडे व त्यांच्या पदाधिकाऱ्यानी नगरपालिके समोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे . या उपोषणाला सर्व पत्रकारानी पाठिंबा दिला आहे . तर नगरपालिकेत जो पर्यंत पत्रकार कक्ष देण्यात येणार नाही तो पर्यंत हे उपोषण सुरुच राहणार असल्याचा इशारा प्रदीप रोकडे यानी दिला आहे . दरम्यान या उपोषणाला प्रहार जनशक्तीचे अविनाश सोनवणे . ज्येष्ट पत्रकार दिलीप मालवणकर . कामगार नेते व व संपादक डी बी पाटील . राहटोलीचे सरपंच सुधीर गायकवाड यानी भेट देवुन पाठिंबा दर्शवला आहे . तर पत्रकाराना नगरपालिकेत कक्ष मिळावा म्हणुन उपोषण करावे लागते ही लाजिरवाणी गोष्ट आहे . बदलापुर शहरात शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे . भाजपाचे नेते राम पातकर . राजन घोरपडे . राष्ट्रवादीचे नेते कालिदास देशमुख . आशिष दामले यांच्या सारखे दिग्गज नेते असताना पत्रकाराना कक्ष मिळावा म्हणुन उपोषण करावे लागते ही बाब येथील राजकारण्याना शोभणारी वाटत नाही .

संबंधित पोस्ट