अंबरनाथ येथे उभारण्यात येणाऱ्या मेडिकल हबच्या जागेची सहसंचालका कडुन पाहणी .

अंबरनाथ(प्रतिनिधी) :  अंबरनाथ पूर्व भागातील सर्वे नं.१६६ येथील तब्बल २६ एकर शासकीय जागेवर ठाणे जिल्ह्याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावे याकरिता पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी शासन स्तरावर केलेल्या पाठपुराव्यानुसार वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.अमित देशमुख यांनी अंबरनाथ येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास मंजुरी देत सर्व आवश्यक बाबींचा समावेश करून अहवाल सादर करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण विभागाचे  सचिव श्री. सौरभ विजय यांना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या चार वरीष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली असून सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियोजित  जागेची पाहणी सह संचालक डॉ. चंदनवाले यांनी केली आहे तर त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. तसेच यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी छाया उपजिल्हा रुग्णालय त्याचबरोबर उल्हासनगर ३ येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाची   देखील पाहणी केली.यावेळी शहर संघटक श्री.सुनिल चौधरी, उपशहरप्रमुख श्री.पुरुषोत्तम उगले, श्री.गणेश कोतेकर, माजी नगरसेवक श्री. सुभाष साळुंखे, श्री.तुळशीराम चौधरी, प्रांत अधिकारी श्री.जयराज कारभारी, तहसीलदार श्री.जयराज देशमुख, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, छाया हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिष पाटोळे, तालुका भूमी अभिलेख अधिकारी श्रीमती मांढरे, श्री.विकास अडांगळे, नगरपरिषदेचे प्रकल्प सल्लागार श्री. राजेंद्र हावळ, सहायक नगररचनाकार  श्री. राजेंद्र हेले आदी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट