अंबरनाथ तालुक्यातील सरपंच पदांच्या आरक्षणाचा वाद निवडणुक आयोगा कडे .

पत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिल्ह्याच्या वतीने निवडणूक आयुक्त आणि ठाणे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर.

बदलापूर(प्रतिनिधी) :  ठाणे जिल्ह्यातील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर  ठाणे जिल्ह्या  मधिल  अंबरनाथ  तालुक्यातील सरपंच पदांच्या आरक्षणा बाबत औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी तसेच मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांच्या कडे निवेदन सादर करुन कारवाईची मागणी केली आहे, पत्रकार सुरक्षा समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे व सरचिटणीस श्री प्रदिप गोविंद रोकडे यांनी सदरचे निवेदन ठाणे जिल्हाधिकारी   आणि राज्य निवडणूक आयोगाला सादर केले आहे.नुकत्याच अंबरनाथ  तालुक्यातील जवळ जवळ २८ ग्रामपंचायत च्या निवडणुका संपन्न झाल्या असुन   सदर निवडणुकी नंतर सरपंच पदांच्या आरक्षणा बाबत घोषणा करण्यात आली आहे,याच अनुषंगाने मा, उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशानुसार शासकीय उपभोक्ता खंडपीठ औरंगाबाद यांनी संदर्भिय  पत्रा नुसार दिनांक १६/१२/२०२०पुर्वी ज्या जिल्ह्यात मुंबई ग्रामपंचायत (सरपंच, उपसरपंच) निवडणूक नियम १९६४मधिल नियम ३,४,४ अ ५ व ६ मधिल तरतुदी नुसार सरपंच आरक्षण सोडत राबविण्यात आली होती,त्या जिल्ह्यांनी सरपंच आरक्षण सोडत नव्याने राबविताना मुंबई ग्रामपंचायत (सरपंच उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधिल नियम ३,४,४ अ ५ व ६ मधिल तरतुदी नुसार अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण यात कुठला ही बदल होणार नाही याची खबरदारी घ्यावी, तसेच मा, उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान व मुंबई ग्रामपंचायत (सरपंच उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधिल ३,४,४ अ ५ व ६ मधिल तरतुदीचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा प्रकारचे आदेश महाराष्ट्र शासनाला दिलेले असुन ते राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये बंधनकारक असल्याने महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हाधिकारी यांना तशा प्रकारच्या सुचना देण्यात आल्या असताना देखील अंबरनाथ  तालुक्यातील आरक्षणे बदलण्यात आली आहेत त्या मुळे खंडपीठाने दिलेल्या आदेशाचा भंगच झाला असून ही बाब अतिशय गंभीर असुन या बाबत तातडीने निर्णय घेऊन ठाणे जिल्ह्यातील तसेच अंबरनाथ तालुक्यातील सरपंच पदांच्या साठी जाहीर केलेले आरक्षण तात्काळ रद्द करण्यात यावे आणि औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाच्या प्रमाणे आरक्षणे जाहीर करावीत अशा प्रकारचे निवेदन  ५/२/२०२१ रोजी मा जिल्हाधिकारी ठाणे आणि मा, निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या कडे पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने देण्यात आले असून या वेळी पत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री अरुण ठोंबरे,समितीचे बदलापुर शहर अध्यक्ष श्री भरत कारंडे, राहटोली ग्रामपंचायत सदस्य श्री सुधीर गायकवाड निवेदन सादर करताना उपस्थित होते, याच अनुषंगाने शासनाने घेतलेल्या या राजकीय निर्णयाच्या विरोधात पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने तातडीने याचिका दाखल करणार  असल्याचे समितीचे ठाणे जिल्हा सरचिटणीस श्री प्रदिप गोविंद रोकडे यांनी सांगितले आहे,

संबंधित पोस्ट