एकमेकांना संपवण्याची भाषा करणारे बसले मांडीला मांडी लावून
- by Adarsh Maharashtra
- Feb 07, 2021
- 1014 views
सातारा : जावळी-सातारा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये गेल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसनं शशिकांत शिंदेच्या रूपानं तिथं पुन्हा एकदा ताकद उभी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातून आता शिवेंद्रराजे व शशिकांत शिंदे असा सामना रंगला आहे. शिवेंद्रराजे यांनी विरोधकांना संपवण्याची भाषा केल्यामुळं या वादाला अधिकच धार चढली आहे.
काही दिवसांपूर्वीच शिवेंद्रराजे भोसले यांनी जाहीर कार्यक्रमात, मी उदयनराजेंच्या विरोधात निवडणूक लढवून निवडून आलेला माणूस आहे. समोरच्याची वाट लागल्या शिवाय गप्प बसत नाही, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा रोख शशिकांत शिंदे यांच्या दिशेने असल्याची चर्चा होती. त्यामुळे शशिकांत शिंदे यांनीही शिवेंद्रराजे यांना प्रत्युत्तर दिले होते.
मात्र, आज साताऱ्यातील एका लग्न समारंभात शिवेंद्रराजे भोसले आणि शशिकांत शिंदे एकत्र दिसून आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. आपल्यात कोणताच वाद नाही अशा आविर्भावात हे दोन्ही नेते एकमेकांच्या बाजूला बसले होते. या अनपेक्षित चित्रामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम