बारवीधरणग्रस्तांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन .

अंबरनाथ(प्रतिनिधी) : बारवी धरण विस्तारीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण होऊनही तळ्याची वाडी, देवराळ वाडी आणि कोळे वडखळ येथील  तीन आदिवासी पाड्यातील नागरिकांनी प्रजासत्ताक बुधवारी  अंबरनाथ येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयावर धडक देऊन ठिय्या आंदोलन  केले. 

श्रमिक मुक्ती संघटनेच्या  ॲड . इंदवी तुळपुळे यांच्या नेतृत्वाखाली  अनंता मेंगाळ, जगणं बरतड, यशवंत खंडवी, लक्ष्मण शिद, बुधाजी भंवर विठ्ठल खंडवी आणि लक्ष्म बांगरा यांच्या नेतृत्वाखाली तळ्याची वाडी , देवराल वाडी, आणि कोळे  वडखळ  येथील आदिवासी बांधवानी येताना लागणारी अन्नधान्याच्या सामानासह एमआयडीसी कार्यालयाबाहेर तळ ठोकला आहे. बारवी धरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील विस्तारीकरणानंतर तळ्याची वाडी, देवराल वाडी, आणि कोळे  वडखळ गावातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत, तळ्याच्या वाडीच्या ग्रामस्थांना रस्ता नसल्याने गरोदर महिला , आजारी नागरिकांना कापडाची झोळीमधून रुग्णालयात न्यावे लागते. तळ्याच्या वाडीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तेथील नागरिकांना प्राथमिक सुविधा पुरवण्याबाबत एमआयडीसी आणि जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये वाटाघाटी सुरु झाल्या आहेत, तरीही या गावाचा पुनर्वसनाचा तिढा सुटू शकला नाही , कोळे वडखळच्या ग्रामस्थांना इच्छितस्थळी नेण्याला एमआयडीसी प्रशासनाने कार्यवाही केली नसल्याचा त्या ग्रामस्थांचा आरोप आहे. तळ्याची वाडीमधील सर्व आदिवासी बांधवांचे  त्वरित पुनर्वसन करावे , वनहक्क मान्यता कायद्यानुसार बाधितांना मोबदला आणि पर्यायी जमिनी द्याव्यात मी बाधित होऊनही संपादित न केलेल्या जमिनी संपादित करून त्यांचा मोबदला आणि नुकसान भरपाई त्वरित द्यावी या आणि अन्य मागण्यांची पूर्तता करून घेण्यासाठी आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यात आले. 

मुरबाड आणि ग्रामीण भागातून अंबरनाथला आलेल्या आदिवासी बांधवांनी मागण्या मेनी होईपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार केला असल्याने येताना सोबत जेवण बनवण्या साठी आवश्यक वस्तू आणल्या आहेत. दुपारी तीन वाजता सोबत आणलेल्या  चटणी- भाकरीच्या  शिदोरीचा आस्वाद घेतला.

संबंधित पोस्ट