कोविड योद्ध्यांच्या वारसांना पालिकेत नोकरी.

बदलापूर (प्रतिनिधी) :  कोरोना काळात कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झाल्याने मृत्युमुखी पडलेल्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेतील दोन कोविड योद्ध्यांच्या वारसांना नगर परिषदेत नोकरी देण्यात आली आहे.

 कुळगाव बदलापूर नगर परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोनाकाळात नागरिकांच्या आरोग्याचा हितासाठी कार्यरत राहून मोलाचे योगदान दिले आहे. हे करत असताना अनेक कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी आरोग्य विभागातील दर्शन दहिवलीकर व सुमित जाधव या दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मंगळवारी  कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीपत्र देऊन या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कुळगाव बदलापूर नगर परिषद प्रशासनाने कोरोनाकाळात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने नियुक्ती दिल्याबद्दल नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून 

याबद्दल प्रशासन तसेच मुख्याधिकारी दीपक पुजारी यांचे आभार मानले आहेत.

संबंधित पोस्ट