टीआरटी मशिन घसरल्यामुळे अपघात,एका कामगाराचा मृत्यू दोन जखमी .
- by Rameshwar Gawai
- Jan 27, 2021
- 1560 views
अंबरनाथ(प्रतिनिधी): अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे मार्गावर रेल्वे रुळाखालील स्लीपर्स बदलन्याचे काम करण्यात येत असतांना स्लीपर्स बदलणा-या टीआरटी मशिन घसरल्याने एका कर्मचा-याचा मृत्यू झाला आहे . तर दोघेजण जखमी झाले आहेत. हा प्रकार पहाटे ३.३० वाजता घडला. या अपघातामुळे सकाळी ९.४५ वाजेर्पयत रेल्वेसेवा ठप्प होती.
अंबरनाथ आणि बदलापूर या रेल्वे मार्गा वरील डाऊन दिशेवरील रेल्वे रुळाची दुरुस्ती करण्यासाठी पहाटे २ वाजेपासुन मेगाब्लॉक घेण्यात आला होता. हे काम करित असतांना रेल्वे रुळाखालील स्लीपर्स बदलण्यासाठी रेल्वेने टीआरटी यंत्र मागविले होते. त्या यंत्राच्या माध्यमातुन स्लीपर्स बदलले जात असतांना यंत्र घसरल्याने त्या यंत्रखाली तीन कामगार चिरडले गेले. त्यातील राजू जगडे (३६) या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या सोबत काम करणारे वासुदेव सिद आणि गणोश सिद हे जखमी झाले आहेत . त्यांना रेल्वेच्या कल्याण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या अपघातानंतर सकाळपासुन कर्जत दिशेकडील रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली होती. अपघातानंतर घसरलेली टीआरटी मशिन हलविण्यात आली. हे काम करण्यासाठी तब्बल सहा तास लागले. सकाळी ९.४५ वाजता रेल्वेसेवा पूर्ववत झाली.
सकाळपासून रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने कामावर पोहचण्यासाठी अनेक चाकर-मान्यांनी एसटी , बस ,रिक्षा तसेच खाजगी वाहनांचा आधार घेतला. अनेकांनी मोटरसायकल तसेच कार घेऊन कार्यालय गाठणे पसंत केले. त्यामुळे सकाळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने दिसत होती.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम