
कोविड उपाययोजनांच्या खर्चाची श्वेतपत्रिका जाहीर करा-राष्ट्रवादीची मागणी .
- by Rameshwar Gawai
- Jan 22, 2021
- 898 views
बदलापूर(प्रतिनिधी) : कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी करण्यात आलेल्या खर्चाची श्वेतपत्रिका जाहीर करावी,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी केली आहे.
कुळगाव बदलापूर नगर परिषदेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात औषध फवारणी, कम्युनिटी किचन, जनजागृती याबरोबरच शहरात सोनिवली येथे क्वारंटाईन सेंटर, कोविड केअर सेंटर व गौरी हॉल येथे कोविड रुग्णालयाची उभारणी, रुग्णवाहिका व कोविड टेस्ट लॅब आदी अनेक सोयीसुविधा बदलापूरकरांना उपलब्ध करून दिल्या. या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी नगर परिषदेला उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीचा विनियोग योग्य प्रकारे झाला आहे की नाही याची माहिती शहरातील सर्वसामान्य नागरिकांना मिळावी, यासाठी नगर परिषद प्रशासनाने श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी आपली मागणी असून याबाबत नगर परिषद प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले असल्याची माहिती अविनाश देशमुख यांनी दिली.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम