पीएमसी बँक घोटाळा: वसई-विरारमध्ये ईडीची धाड, हितेंद्र ठाकुर यांच्या विवा ग्रुपच्या कार्यालयांमध्ये छापेमारी
- by Adarsh Maharashtra
- Jan 22, 2021
- 788 views
वसई, दि.२२ : सक्तवसुली संचलनालय ईडीची वसई-विरार भागात छापेमारी सुरू आहे. पीएमसी बँक घोटाळा ईडीने ही धाड टाकली आहे. वसई, विरार आणि पालघरमधील पाच ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे. ईडीने या प्रकरणी या भागातील प्रसिद्ध विवा ग्रुपच्या विविध कार्यालयांमध्ये छापेमारी केली आहे. याव्यतिरिक्त इतरही काही ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे. अद्यापही ही छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर येते आहे. महत्त्वाचे म्हणजे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकुर यांचा हा विवा ग्रुप आहे. त्यामुळे या छापेमारीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या छापेमारीनंतर ठाकुर कुटुंबीयांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम