कुळगाव बदलापूर नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षाने डिझेल दाहीनी बंद .
- by Rameshwar Gawai
- Jan 16, 2021
- 1181 views
बदलापूर(प्रतिनिधी) : बदलापूर पश्चिमेकडील मांजर्ली भागात असलेल्या वैकुंठधाम स्मशानभूमीतील डिझेल शवदाहिनी सुमारे आठवड्याभरापासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता तातडीने डिझेल शवदाहिनी दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
बदलापूर पश्चिमेकडील मांजर्ली भागात असलेली वैकुंठधाम ही शहरातील सर्वात मोठी व शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली स्मशानभूमी आहे. त्याशिवाय डिझेल शवदाहिनीही उपलब्ध आहे. त्यामुळे शहराच्या भागाभागातील बहुतांश नागरिक अंत्यसंस्कारासाठी या स्मशानभूमीत येत असतात. मात्र सुमारे आठवड्याभरापासून या स्मशानभूमीतील डिझेल शवदाहिनी बंद असल्याने नागरिकांना लाकडावरच्या शवदाहिनीवरच अग्निसंस्कार करावे लागत आहेत. लाकडाच्या शवदाहिनीचे येथे चार स्टँड आहेत. मात्र लाकडाच्या शवदाहिनीवर अग्निसंस्कार करण्यासाठी लागणारा वेळ डिझेल शवदाहिनीच्या तुलनेत अधिक असतो. त्यामुळे याठिकाणी अग्नी-संस्कारासाठी मृतदेहांना वाट पहावी लागते. त्यामुळे नागरिकांची होत असलेली प्रचंड गैरसोय लक्षात घेता तातडीने दुरुस्ती करून डिझेल शवदाहिनी सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार तात्यासाहेब सोनवणे यांनी कुळगाव बदलापूर नगर परिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.दरम्यान, यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी मुख्याधिकारी दीपक पुजारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम