
कोविशिल्ड बदलापूरात दाखल .
- by Rameshwar Gawai
- Jan 15, 2021
- 663 views
बदलापूर(प्रतिनिधी) : कुळगाव बदलापूर नगर परिषदेला लसीकरणासाठी कोविशिल्ड लस उपलब्ध झाली आहे. यामध्ये २२० लस असून शनिवार (ता.१६) पासून लसीकरणाला सुरुवात होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनीं दिली.
पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार असून शनिवारी लसीकरण मोहिमेला सुरुवात करताना १०० आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश अंकुश यांनी स्पष्ट केले. या लसी ठेवण्यासाठी २ ते ८ डिग्री सेल्सिअस तापमान आवश्यक असते. त्यासाठी नगर परिषदेला आयएलआरही(आईस लाईन रेफ्रिजरेटर) उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम