काँग्रेस पक्षाची निष्ठा ही माझ्या रक्तातच आहे ! माजी नगरसेवक दिपक पाटील यांनी व्यक्त केले मत

नवी मुंबई:(सुनिल गायकवाड) काँग्रेस पक्षाचे नातं आणि माझी निष्ठा ही माझ्या रक्तातच आहे त्या मुळे मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत सैनिकच आहे सैनिकांचे काम जे असते ते मी गेल्या अनेक वर्षापासुन प्रमाणिक पणे करत आलो आहे.

काँग्रेस पक्षाची ओळख हि माझ्या आजोबांनी करुन दिली त्या ओळखी नंतर माझ्या वडीलांनी ती परंपरा कायम ठेवत ती माझ्या पर्यंत पोहोचवली तीच परंपरा कायम स्वरुपी आज पर्यंत मी आणि माझ्या कुटुंबांनी टिकवून ठेवली आहे. म्हणूनच माझ्यावर काँग्रेस पक्षाची बांधिलकी आणि जबाबदारी मोठ्या प्रमाणात आहे. 

माझ्याकडे अनेक पक्षाचे नेते आले आणि गेले पण मी माझ्या मताशी ठाम राहत काँग्रेसचे काम करत आहे. नवी मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बुधवारी घनसोली गावात एका बैठकीची आयोजन करण्यात आले होते या वेळी दिपक पाटील बोलत होते.

दरम्यान: या वेळी काँग्रेस पक्षाचे महासचिव मो.तारीक फारुखी, नवी मुंबई काँग्रेसचे अनिल कौशिक, शितल म्हात्रे, माजी उपमहापौर रमाकंत म्हात्रे, माजी नगरसेविका शोभा दिपक पाटील इंटक चे प्रदेश सचिव मनोहर शिवपुजे, काँग्रेसचे कोपरखैरणे तालुका अध्यक्ष धोंडीराम पाटील इत्यादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट