धोंडीराम पाटील यांच्या मुळे कोपरखैरणे विभागात काँग्रेसला मिळाली नवसंजीवनी

नवीमुंबई:(सुनिल गायकवाड)   नवीमुंबई  महानगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कोपरखैरणे सेक्टर-१९ या ठिकाणी कोपरखैरणे ब्लाँक काँग्रेस कमिटीच्या वतीने एक बैठीकीचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन  कोपरखैरणे ब्लाँक मध्ये काँग्रेस पक्षाची मोठी ताकत आहे हे चित्र निर्माण केले होते.

या वेळी  काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी कोपरखैरणे विभागात या पुर्वी काँग्रेस पक्षाची ताकत नव्हती हे मान्य करुन कोपरखैरणे मधील प्रत्येक वार्डत काँग्रेसची मोठी ताकत वाढत असल्याचे मत व्यक्त करुन धोंडीराम पाटील यांच्या अथक प्रयत्न मुळे काँग्रेस पक्षाला नवीन संजीवन मिळाल्याचे मत या बैठकीत व्यक्त  केले.

दरम्यान या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना काँग्रेसचे प्रदेश महासचिव तारीफ फारुखी नवीमुंबई काँग्रेस चे अध्यक्ष अनिल कौशिक, शितल म्हात्रे, माजी नगरसेवक दिपक पाटील, इंटकचे महाराष्ट्राचे सचिव मनोहर शिवपुजे महाराष्ट्र राज्याचे इंटक उपाध्यक्ष प्रभात वेल्हाळ अँड त्रिबके, माजी उप महापौर रमाकांत म्हात्रे इत्यादी मामान्यवरांनी या बैठकीत मार्गदर्शन केले.

संबंधित पोस्ट