पोलिसांनी साधला विद्यार्थ्यांशी,महिलांशी व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद.

बदलापूर(प्रतिनिधी) :  बदलापूर पश्चिम पोलिसांनी रेझिंग डे चे  औचित्य साधून विद्यार्थी-पालक, महिला व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. बालकांच्या व महिलांच्या व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करून पोलीस सदैव मदतीसाठी तत्पर राहतील,अशी ग्वाही बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी दिली.

गार्गी सोशल ॲकॅडमी, हेंद्रपाडा येथे रेझिंग डे सप्ताह निमित्त बालकांची सुरक्षा, महिलांची सुरक्षा बाबत सुसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकित बालकांची, महिलांची सुरक्षा, त्यांचे हक्क व कायदे, तसेच ऑनलाइन सायबर क्राइमची माहिती,  कोरोना व्हायरस संदर्भात कशी काळजी घ्यावी, त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता राखून साथीच्या आजारावर कशी मात करता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सहायक  पोलीस निरीक्षक सागर ढिकले  यानी अंमली पदार्थ या विषयावर मार्गदर्शन केले.गार्गी सोशल ॲकॅडमीच्या अध्यक्ष मीना चव्हाण, प्रशिक्षक संतोष चव्हाण,पोलीस अंमलदार दत्तात्रय वाघ, भारत पवार, राकेश व्हटकर, नितीन पादीर, विपुल पाटील आदी  उपस्थित होते. सर्वोदय नगर येथेही रेझिंग डे सप्ताह निमित्त बालकाची व महिलांची सुरक्षा, तसेच ऑनलाइन सायबर क्राइम बाबत महिला दक्षता समिती व महिलांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकित  वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे व पोलीस उपनिरीक्षक  दोंदे यांनी महिलांना बालकाची व महिलांची सुरक्षा, तसेच ऑनलाइन सायबर क्राइम बाबत माहिती दिली.

बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात आयोजित बैठकीत  ज्येष्ठ नागरिकांना त्यांची सुरक्षा, तसेच ऑनलाइन सायबर क्राइम बाबत,व ज्येष्ठ नागरिक कायद्याची  माहिती,  कोरोना व्हायरस संदर्भात कशी काळजी घ्यावी, त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता राखून साथीच्या आजारावर कशी मात करता येईल व आपले स्वसंरक्षण कसे करावे याबाबत त्याचप्रमाणे चैन स्नेचींग , घरफोडी संदर्भात घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत माहिती देऊन त्यापासून कसे संरक्षण करता येईल याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी मार्गदर्शन केले.

संबंधित पोस्ट