विरार,मनवेलपाडा येथील इमारतींना शिवसेनेकडुन सुखा-ओला कचऱ्याचे डब्बे वाटप

विरारकोरोना विषाणुचा अजूनही न स्थिरावलेल्या संसर्गाकडे लक्ष केंद्रित करत वाढत्या रोगराईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच त्याच्या वर आळा घालण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान या मोहिमे अंर्तगत तसेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.श्री.उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांचे कोरोना संसर्गावर विजय मिळवण्यासाठी सुरू असलेले आटोकाट प्रयत्नांना मदत व्हावी या उध्देशाने व नगरविकासमंत्री मान.श्री.एकनाथ शिंदे  व संपर्कप्रमुख, आमदार श्री.रविंद्र फाटक  यांच्या प्रेरणेने मनवेलपाडा विभागातल्या सोसायटींकडुन आलेल्या लेखी मागणीनुसार वसई-विरार शहर महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून नवीन वर्षाच्या सुरूवातीपासुन म्हणजेच 01 जानेवारी 2021 पासुन शिवसेना उपशहर प्रमुख श्री.उदय अ.जाधव यांच्या हस्ते शिवसेना "मातोश्री" जनसंपर्क कार्यालय येथे मनवेलपाडा विभागातील आतापर्यंत 15 सोसायटींना सुका व ओला कचरा वेगवेगळा वर्गीकरण करण्यासाठी प्रत्येकी 02 कचर्याच्या डब्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी श्री.प्रविण आयरे, श्री.संतोष राणे, सौ.रोशनी रा.जाधव, सौ.साक्षी उ.जाधव, श्री.श्याम मोरे, श्री.रोहित कदम, निखील आगरे, संजय चव्हाण, दिनेश खळे, सागर नाचरे तसेच पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संबंधित पोस्ट