झाडाखाली भरणारी शाळा 'मानिवली आदिवासी पाडयात. अंबरनाथ तालुका पत्रकार सुरक्षा समितीने केला 'पत्रकार दिन' साजरा.

अंबरनाथ(प्रतिनिधी) : अंबरनाथ तालुका पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने ६  जानेवारी मराठी  पत्रकार दिनाचे औचित्य साधुन सामाजिक उपक्रमा अंतर्गत ठाणे जिल्हयातील अंबरनाथ  तालुक्यामधील शंभर टक्के आदिवासी पाडयातील ' झाडाखाली भरणारी शाळा ' मानिवली येथे सदिच्छा भेट देवुन शैक्षणिक प्रोत्साहन  उद्देशाने सोशल डिस्टन्सिगंचे पालन करत सामितीच्या पदाधिका-यांच्या हस्ते मुलांना खाऊ, ब्लॅकेट व मातांना साडी तसेच मानिवली गावाचे समाजसेवक चंद्रकांत बाळाराम गायकर यांच्याकडुन मुलांना वही-पेन्सिल देण्यात आली.

पत्रकारीतेत अनेक आव्हानाना सामोरे जात असताना शहर असो वा ग्रामीण भागाच्या विकासाभिमुख समस्या मांडुन त्या मार्गस्थ लावताना वेळ प्रसंगी जीव धोक्यात  घालून धाडसी वृत्तीने न्याय मिळवुन देण्यासाठी पत्रकार हे आपल्या लेखणी शस्त्राचा वार करत असतात.  आजही आदिवासी पाडयांना रस्ते सापडत नाहीत. पाण्याचे दुर्भिक्ष पाचविलाच पुजलेले असते. आपले आई-वडील शिकले नसतील तो डाग  मुलांनी पुसुन काढला पहिजे, कोरोना काळात शाळा बंद असताना आदिवासी मुलं शिक्षण प्रवाहातून दूर होऊ नयेत  या प्रांजळ उद्देशाने ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या सहकार्याने जीवाची बाजी लावून कोरोना योध्दा शिक्षकमित्र रश्मि गायकर मॅडम यांचे  हे ज्ञानदानाचे  कार्य अनमोल आहेच, त्याचबरोबर बहुतेक ठाणे जिल्हयात झाडाखाली भरणारी ही शाळा पटसंख्येने भारीच पडेल अशा या स्तुत्य  शैक्षणिक उपक्रमात खारीचा वाटा उचलुन समाज प्रबोधनाबरोबर सामाजिक बांधिलकीने पत्रकार सुरक्षा समितीने सोशल डिस्टन्सिगेचे धडे गिरवत झाडाखाली भरणा-या शाळेत बसताना, मनाला आत्मिक समाधान मिळाल्याचे मत पत्रकार सुरक्षा समितीचे अंबरनाथ तालुका अध्यक्ष अशोक नाईक यांनी व्यक्त केले.

अंबरनाथ  तालुक्यातील मानिवली आदीवासी पाडयात जिल्हा परिषदेची ८  वी पर्यत शाळा आहे. दरम्यान कोरोना काळात शाळा बंद असली तरी  कोरोना नियमांची जनजागृती आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत येथील आदीवासी मुलांचे शिक्षण प्रवाहात सातत्य सुरू ठेवण्याच्या उद्देशाने शिक्षिका  मित्र रश्मी चंद्रकांत गायकर या नियमित येथील झाडाखाली मोकळया वातावरणात शाळा भरवतात, अशा या स्तुत्य  शैक्षणिक उपक्रमाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अंबरनाथ तालुका पत्रकार सुरक्षा समितीने पत्रकार दिनाचे औचित्य साधुन सामाजिक बांधिलकी जपत मुलांना खाउ, पेन, पेन्सिल, ब्लॅकेट व माताना साडी भेट देवुन पत्रकार दिन साजरा केला. यावेळी पत्रकार समितीचे अंबरनाथ तालुका अध्यक्ष अशोक नाईक, उपाध्यक्ष अजय चिरीवेल्ला, कार्याध्यक्ष वामन उगले, सचिव प्रविण राणे, खजिनदार जाफर वनु, समन्वयक संतोष तिवारी, बबलु चक्रबाॅर्ती तसेच शिक्षिका रश्मि गायकर, समाजसेवक चंद्रकांत गायकर जिल्हा परिषद शिक्षक विजय प्रगणे आदी उपस्थित होते.

निसर्गरम्य वातारणात असलेल्या मानिवली जिल्हा परिषदे शाळेला देखील अद्यावत  ज्ञानमंदीर स्वरूप देण्याचे काम नवीमुंबई येथील क्रीडा  कंपनीच्या सहकार्याने आरंभ संस्थेच्या  शोभामूर्ती मॅडम तसेच आशुतोष वैद्य, राकेश कोठारे यांच्या संकल्पनेतुन शाळेतील वर्गात जे जे आर्टच्या चित्रकाराची भिंती रंगसंगतीने मनमोहक सजवल्या आहेत. रेन वाॅटर हार्वेस्टिंग, पाण्याची उत्तम सोय, वनौषधी, सुलभ शौचालय, टिपटाॅप संगणक रूम, शाळेला सुरक्षित कंपाउंड टाकुन आजुबाजुचा परिसर हिरवाईने भरत असल्याचे  जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नंदु चौधरी यांनी पत्रकार सुरक्षा समिततीच्या पदाधिकारी यांना शाळेला भेट देताना सांगितले.

संबंधित पोस्ट