
अंबरनाथ राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडी कडुन अंगणवाडी सेविकांचा सन्मान .
- by Rameshwar Gawai
- Jan 05, 2021
- 1456 views
अंबरनाथ(प्रतिनिधी) : राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडी तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरातील अंगणवाडी सेविकांचा सन्मान करण्यात आला आहे .
अंबरनाथ येथिल महालक्ष्मी नगर राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात शहरातील अंगणवाडी सेविका, वकील, उच्चशिक्षित ,डॉक्टर महिला यांचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी च्या ठाणे जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षा विद्याताई वेखंडे यांच्या प्रमूख उपस्थितीत महिलांचा सन्मान करण्यात आला. ज्ञानाचा सागर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मुळे शिक्षणात ,राजकारणात, गल्ली ते दिल्ली पर्यंत महिला उच्च पदावर विराजमान झालेल्या असून चुल आणि मुल यातुन सुटका करत महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत काम करतांना पहावयास मिळतात अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श प्रत्येक महिलांनी घ्यावा असे आव्हान विद्या वेखंडे यांनी महिलाना केले आहे . .
यावेळी माजी .बांधकाम सभापती मा.नगरसेवक आणि अंबरनाथ राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
यावेळी विद्याताई वेखंडे, शहराध्यक्ष सदाशिव मामा पाटील, महिला शहराध्यक्षा पुनम शेलार, गणेश गायकवाड,विनोद शेलार निर्मला थोरात,आदि उपस्थितीत होते.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम