शोषित पिडीत कष्टकरी कामागारा साठी नवीमुंबईत इंटकच्या अध्यक्षपदी धोडीराम पाटील यांची निवड केली-मनोहर शिवपुजे यांची प्रतीक्रीया

नवीमुंबई :(सुनिल गायकवाड)कोरोनाच्या माहामारी मध्ये अनेक कुटूंब बेरोजगार झाले नवीमुंबईत अनेक कंपन्या बंद झाल्याने मुंबई आणि नवीमुंबई मध्ये कामगारवर्गावर बेकारीचे महासंकट कोसळले आहे.

या काळात नवीमुंबई मध्ये कामगार वर्गाला न्याय देण्यासाठी इंटक ची खरी गरज होती. 

हि गरज पुर्ण करुन नवीमुंबईत इंटक संघटना कामाला लागली असुन या संघटनेत भक्कम नेतृत्वाची उणीव नवीमुंबई कार्यक्षेत्रात होती ही उणीव भरून काढण्यासाठी नवी मुंबईच्या (इंटक) राष्ट्रीय मजुर काँग्रेस च्या अध्यक्षपदी धोडीराम पाटील यांची निवड केल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य इंटक चे सचिव पत्रकार साहित्यिक मनोहर शिवपुजे यांनी दिली.

कोपरखैरणे मध्ये सेक्टर 19 या ठिकाणी धोडीराम पाटील यांच्या नियुक्ती पदाच्या पत्राबाबत महाराष्ट्र राज्य इंटक चे राज्य अध्यक्ष राधाकृष्ण खंडागळे यांनी अधिकृत पत्र देऊन धोडीराम पाटील यांची नवीमुंबईच्या इंटक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड केली आहे .

या वेळी खंडागळे म्हणाले कि इंटक ही देशातील सर्वात मोठी कामगारांची संघटना असुन देशातील प्रत्येक राज्यात इंटकचे  कागार क्षेत्रात मोठ्या जोमाने काम सुरू आहे या पुढे मुंबई च्या हाकेवर नवीमुंबई हे सर्व ठिकाणी चर्चेत असणारे शहर आहे या शहरात इंटरची ताकद कुठे ही कमी पडता कामा नये या साठी नवनिर्वाचित अध्यक्षांनी प्रत्येक कामगार क्षेत्रातील नाका मजूर ते  कारखाना क्षेत्रातील कष्टकरी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी या पुढाकार घ्यावा त्या साठी महाराष्ट्रातील मजुर काँग्रेस (इंटक) धोडीराम पाटीलांच्या मागे खंबीर पणे उभी राहील असा विश्वास देखील व्यक्त करुन धोडीराम पाटील यांना नवीमुंबईत अधिकृतरित्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली  त्यांना त्या बाबतचे पत्र देखील खंडागळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

नवीमुंबई काँग्रेस चे नेते माजी नगरसेवक दिपक पाटील यांनी आपले मत व्यक्त करतांना म्हटले कि नवीमुंबई ही अशिया खंडातील एक नबंर अशी कारखानादारीतील वसाहत आहे येथील मजूर हा सध्याच्या स्थितीत सैरावैरा परीस्थिती मध्ये आहे त्याला स्थिर स्थितीत आणण्यासाठी इंटक ची खरी गरज आहे धोडीराम पाटील यांची निवड कामगारांना नक्कीच न्याय मिळवून देईल असा आशावाद व्यक्त करत कोपरखैरणे आणि घनसोली हे आई आणि मावशी चे नाते आहे त्यामुळे काँग्रेसचा नवीमुंबई सचिव म्हणून इंटक संघटनेच्या सदैव पाठीशी उभा राहील असा ठाम विश्वास दीपक पाटील यांनी व्यक्त केला. 

दरम्यान या वेळी महाराष्ट्र इंटक चे प्रदेश सचिव भारत महापुरकर (जैन) पत्रकार राजेश जैस्वार,अाच्युत मोरे,सुरेश गायरवाड, सुरेंद्र सरोज, संजय वाघमारे,महाराष्ट्र काँग्रेस लिगल सेलचे सचिव नंदलाल त्रिबके, माया ठाकुर,सामाजिक कार्यकर्ते गौतमभाई तायडे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट