निराधारांना ब्लॅंकेटची भेट,द युवा फाउंडेशनचा उपक्रम

अंबरनाथ(प्रतिनिधी) :  गुलाबी थंडीची मजा काही औरच असते.गेल्या काही दिवसांपासून सर्वांना हा सुखद गारवा अनुभवास येत आहे. मात्र डोक्यावर छत नसलेल्या निराधारांना थंडीत कुडकुडत रात्र काढावी लागत आहे. अशा निराधारांना  'द युवा युनिटी फाउंडेशन'ने ब्लॅंकेट भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.

'द युवा युनिटी फाउंडेशन'चे अध्यक्ष योगेश चलवादी यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या टीममधील सहकाऱ्यांनी २५ डिसेंम्बरपासून ३१ डिसेंबरपर्यंत हा उपक्रम राबविला. बदलापूर ते ठाण्यापर्यंत पदपथावर झोपणाऱ्या नागरिकांना ब्लॅंकेट भेट देण्यात आल्या.  रेल्वे  स्थानके आणि रेल्वेच्या पादचारी पुलांवर झोपणारे नागरिक, वीट भट्यांवर काम करणारे नागरिक व त्यांचे कुटुंबीय आदींना हे ब्लॅंकेट देण्यात आले अंबरनाथचे सर्कस मैदान , प्रकाशनगर परिसरामध्ये दानशूर नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे सुमारे अडीच हजार नागरिकांना यंदा ब्लॅंकेट्सचे वाटप केल्याची माहिती योगेश चलवादी यांनी दिली.

संबंधित पोस्ट